या खात्याचे पैसे ‘लाडक्या बहिणी’कडे वळवले; मंत्र्यांचा संताप, दिला थेट इशारा

या खात्याचे पैसे ‘लाडक्या बहिणी’कडे वळवले; मंत्र्यांचा संताप, दिला थेट इशारा

ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलैमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत या योजनेंतर्गत नऊ हाफ्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र आता या योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडत असल्याचं समोर आलं आहे.

राज्यातील इतर अनेक योजनांचे आणि खात्याचे पैसे लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आल्याचा आरोप सुरुवातीपासूनच विरोधक करत आहेत, मात्र आता मंत्र्यांनी देखील जाहीर नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे.  त्यामुळे पुढील काळात या योजनेवरून सरकारची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट? 

‘लाडकी बहिण योजना चांगली आहे. त्यासाठी पैसे दिले पाहजे. यात दुमत नाही. परंतु विकासाची कामे कमी केले हरकत नाही. मात्र माझा आक्षेप असा आहे की सामाजिक न्याय व आदिवासी खात्याला घटनेच्या तरतुदीनुसार पैसे द्यावे लागतात. त्यात कट करता येत नाही. लाडकी बहीण योजनेसाठी  ४ हजार कोटी,  पंतप्रधान आवास योजनेसाठी १५०० कोटी, ऊर्जा विभागासाठी १४०० कोटी असे एकूण सात हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला आहे.

हा विभाग मागास लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आहे. मुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी जर या खात्याच्या निधीमध्ये कपात केली तर कामे कशी होतील?  यासाठी तरतूद करून द्या असं माझं मत आहे. पैसे इतर ठिकाणी वळवले याचे दुर्गामी परिणाम होतील, उद्रेक होईल. यासाठी मी विनंती करेल सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचे पैसे कपात करू नये, यासाठी मी मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांना पत्र लिहून मागणी करणार आहे. माझ्या खात्यातून पैसे घेताना संमती घेतली पाहजे होती. संमती मागितली असती तर मला देता आली नसती. हे बंधन आम्हाला कायद्याने दिले आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले