उन्हाळ्यात आरोग्यासाठी दही की योगर्ट अधिक फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

उन्हाळ्यात आरोग्यासाठी दही की योगर्ट अधिक फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

उन्हाळा सुरू झाला असून आता प्रत्येकजण स्वत:चे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात थंड पदार्थांचा समावेश करू लागले आहेत. अशा परिस्थितीत काही लोकं उन्हाळ्यात दह्याचे जास्त प्रमाणत सेवन करतात. पण काही लोकं योगर्ट देखील त्यांच्या आहाराचा भाग बनवतात. या दोन्ही गोष्टी दुग्धजन्य पदार्थांचा भाग आहेत. बहुतेक सेलिब्रिटींच्या आहारात योगर्टचा सर्वाधिक प्रमाणात समावेश असतो हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. अशा परिस्थितीत अनेकजण गोंधळून जातात की दही खाणे जास्त फायदेशीर आहे, की योगर्ट?

पोषणतज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की दही आणि योगर्ट दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मात्र या दोन्ही पदार्थांच्या पोषक तत्वांमध्ये फरक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या आहारात दही किंवा योगर्ट समाविष्ट करण्याबद्दल संभ्रमात असाल तर तज्ञांकडून आपण या दोघांपैकी कोणते चांगले आहे. ते जाणुन घेऊयात…

दही की योगर्ट कशात जास्त प्रथिने?

तज्ञांच्या म्हणण्यानुसार दह्यापेक्षा योगर्टमध्ये जास्त प्रथिने असतात. हे तुमच्या स्नायूंना सुधारण्यास आणि तुमचे पोट बराच काळ भरलेले ठेवण्यास खुप मदत करते. स्नायूंच्या वाढीसाठी ते खूप फायदेशीर मानले जाते.

कॅल्शियम आणि प्रथिने

दही आणि योगर्ट दोन्ही कॅल्शियमचे उत्कृष्ट स्रोत आहेत. आहारात यांचा समावेश केल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये जीवनसत्त्वे आणि प्रोबायोटिक्स भरपूर असतात. तथापि दह्यामध्ये योगर्टपेक्षा जास्त कॅल्शियम असते.

कॅलरीज आणि फॅट

योगर्टमध्ये दह्यापेक्षा जास्त कॅलरीज आणि फॅट्स असतात. त्याच वेळी, दह्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर मानले जाते. जर तुमचे वजन कमी होत असेल तर ग्रीक दह्याऐवजी दही खा.

दोघांपैकी कोणते चांगले आहे?

तज्ञांचे म्हणणे आहे की दह्यामध्ये प्रोबायोटिक्स जास्त असतात. योगर्टबद्दल बोलायचे झाले तर, कधीकधी त्यात साखर आणि इतर पदार्थ मिसळले जातात, ज्यामुळे त्याचे आरोग्य फायदे कमी होऊ शकतात. दोन्हीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले