तुम्हालाही झटपट वजन कमी करून स्नायू बळकट करायचे आहेत का? तर करा हा घरगुती उपाय
On
जर तुम्हालाही तंदुरुस्त राहायचे आहे पण जिमला जाण्यासाठी वेळ नसेल. तर वॉल सिट (Wall Sit) ही एक्सरसाईज तुमच्यासाठी परफेक्ट आहे. ही अशी एक सोपी व प्रभावी एक्सरसाईज जी फार कमी लोकांना माहिती आहे. ही एक्सरसाईज करायलाच सोपी नव्हे तर कुठेही, कधीही सहज करता येते. ही एक्सरसाईज करण्यासाठी कोणत्याही उपकरणांची गरज नाही, कोणत्याही मोठ्या जागेची गरज नाही. तुम्हाला ही एक्सरसाईज करण्यासाठी आवश्यकता पडेल ती फक्त एका भिंतीची. तुमच्या उंचीपेक्षा मोठी फक्त एक भिंत ही एक्सरसाईज करण्यासाठी व झटपट वजन कमी करण्यासाठी पुरेशे आहे.
वॅाल सीट एक्सरसाईज म्हणजे नेमकं काय आणि हे कसे करायचे ?
वॉल सिट ही एक सोपी व स्टॅटिक (static) एक्सरसाईज आहे, या व्यामात तुम्हाला एक ठिकाणी स्थिर उभ राहून स्नायूंवर दाब टाकायचा आहे.
१. भिंतीला सरळ टेकून उभे राहा आणि पायांना पुढे आणा.
२. थोडं – थोडं पायात वाकून खाली बसा
३. तुम्ही जणू खुर्चीवर बसले आहात अश्या स्थितीत या व्यामाची पोझिशन घ्याल.
४. या पोझिशन मध्ये तुम्हाला शक्य होईल तितका वेळ राहा. ( सुरुवात ३० -४० सेकंदांपासून करा मग हळूहळू २ मिनिटांपर्यंत वाढवा)
नियमित ही एक्सरसाईज केल्यांनी वजनही कंट्रोलमध्ये राहील आणि स्नायू बळकट व्हायला मदत होईल. तुम्ही हा व्यायाम करण्यासाठी फार कमी वेळ लागेल व खूप सारा फायदा होईल
वॉल सिट्सचे या व्यामाचे ५ मुख्य फायदे
१. पायाचे स्नायू बळकट होतात
जर्नल ऑफ फिजिकल थेरेपी सायन्सच्या अहवालानुसार ( वॉल सिट एक्सरसाइज हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्सची ताकद वाढवते. शरीरातले हे स्नायू मजबूत झाल्यास शरीरात स्फूर्ती वाढते आणि चालण्याची, धावण्याची ताकद मिळते.
२. शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करते
हा व्यायाम करताना तुमच्या पायाच्या स्नायूंवर दाब पडतो व शरीरातील अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी होऊ लागते.विशेषतः पायांबरोबरच ही एक्सरसाइज तुम्हाला मांड्या आणि कंबरेतल्या भागातील चरबी हटवण्यास मदत करते.
३. मसल्सलची ताकद वाढवते
ही एक्सरसाइज फक्त बाहेरूनच नाही तर कोअर मसल्सलचीही ताकद वाढवते. शरीराचा समतोल राखण्यासाठी मसल्सलचीही खुप मेहनत असते मग ही एकच एक्सरसाइज तेही मजबूत ठेवण्याचे काम करते
४. गुडघ्यांतील ताकद वाढवून सांध्यांच्या समस्या दूर करते
तुम्हालाही गुडघे दुखीच्या समस्या असतील तर वॉल सिट्स तुमच्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. हा व्यायाम गुडघ्यांतील स्नायू आणि सांधे मजबूत करून भविष्यातील दुखण्याचा त्रास दूर करते.
५. कुठेही, कधीही सहज रित्या करता येणारी एक्सरसाईज
या एक्सरसाइजसाठी कोणत्याही महागड्या वस्तूची गरज लागत नाही. खास असा वेळ काढून कुठे जाव लागत नाही. जिम किंवा ईतर गोष्टींची गरज लागत नाही.
वॉल सिट करताना या चुका टाळा!
१. पाठीचा ताण कमी ठेवण्यासाठी पाठ पूर्णपणे भिंतीला टेकलेली असावी.
२. गुडघे ९० अंशाच्या कोनात असले पाहिजेत, खूप पुढे किंवा मागे झुकू नयेत.
३. नियमित आणि खोल श्वास घेणे आवश्यक आहे. नाहीतर वेगळेच आजार होऊ शकतात
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
16 Mar 2025 14:05:09
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. बीडमध्ये चाललंय तरी काय?...
Comment List