नियमित दही खाणे उत्तमच, पण कोणत्या वेळेत खावे, फायदा जाणून घ्या…
तुम्ही सकाळी नाश्त्यात दह्याचे सेवन केले तर त्याचे तुम्हाला अनेक फायदे होतात. नाश्त्यात दही खाणे ही जुनी परंपरा आहे. जर तुम्ही सकाळी नाश्त्यात दही खात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
नाश्त्यात दही खाल्यानंतर तुमची प्रतिकारक्षमता (इम्यूनिटी) वाढते. दह्यात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी इम्यून सेल्स वाढवतो. त्यामुळे अनेक गंभीर आजापासून तुम्हाला मदत मिळू शकते. व्हिटॅमिन सीमुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणारे अनेक रोग टाळण्यास मदत होऊ शकते. तसेच फ्लूसारखे ऋतूजन्य आजारांपासून बचाव होतो.
दह्याची खास वैशिष्टय म्हणजे त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात. यामुळे शरीरातील सूक्ष्मजीवांचे संतुलन होते. दह्यामधील अँटिऑक्सिडंट आणि प्रोबायोटिक घटकांमुळे सूक्ष्मजीवांचे संतुलन सुधारते. त्यामुळे पचनकार्य चांगले होते. शरीराचे पीएच बॅलेन्स होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List