दररोज नियमित चालून सुद्धा वजन कमी होत नाहीये? ‘या’ गोष्टी टाळा अन्यथा..
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या पिण्यामध्ये जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. जंक फूडचं अति सेवन केल्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि वजन वाढीच्या समस्या होऊ शकतात. वाढलेल्या वजनामुळे तुमच्या शरीरामध्ये अनेक समस्या उद्भवतात. अलिकडो लोकांमध्ये फिटनेसबद्दल जागरूकता वाढली आहे. अनेकजण त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जेवणानंतर चालतात. चेलणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंक फायदेशीर मानले जाते. दररोज नियमित 2000 पावले चालल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
दररोज नियमित चालल्यामुळे मधुमेहचा आणि कोलेस्ट्रलचा धोका कमी होण्यास मदत होते. अनेकजण सकाळी तर अनेकांना रात्री जेवल्यानंतर चालण्याची सवय असते. पण अनेक लोकं चालताना काही सामान्य चुका करतात ज्यामुळे तुमच्या शरीराचे नुकसान होऊ शकते. चालल्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराची हालचाल होते. शरीराची योग्य हालचाल झाल्यामुळे तुमचे वजन वाढत नाही आणि तुमचं शरीर निरोगी राहाण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया चालताना काय चुका करू नये.
काही लोकांना रिकाम्या पोटी चालण्याची सवय असते. पण या काळात, साध्या चुका देखील तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान पोहोचवू शकतात. रिकाम्या पोटी चालताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, जेणेकरून त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही. रिकाम्या पोटी चालल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही खूप वेगाने चालण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या शरीरात ग्लुकोजची कमतरता असू शकते ज्यामुळे तुम्हाला चक्कर येणे, अशक्तपणा किंवा थकवा जाणवू शकतो. रिकाम्या पोटी चालताना, वेगाने चालणे टाळा, त्याऐवजी हळू आणि आरामात चाला. चालताना शरीराला घाम येतो, ज्यामुळे पाण्याचे नुकसान होऊ शकते. जर तुम्ही रिकाम्या पोटी चालत असाल आणि पुरेसे पाणी पित नसाल तर डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो. डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी, थकवा आणि शरीराच्या कार्यात अडथळा येऊ शकतो. म्हणून, चालण्यापूर्वी पाणी पिणे महत्वाचे आहे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहील.
काही लोक रिकाम्या पोटी चालल्यानंतरही अन्न खात नाहीत. तर चालल्यानंतर शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते जेणेकरून स्नायू आणि शरीर पुन्हा तयार करता येईल. जर तुम्ही चालल्यानंतर जेवले नाही तर तुमच्या शरीरात प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे शरीराची पुनर्प्राप्ती मंदावते. चालल्यानंतर लगेचच हलके आणि संतुलित अन्न खाणे महत्वाचे आहे जसे की फळे, काजू किंवा दही, जेणेकरून शरीराला योग्य पोषण मिळेल. रिकाम्या पोटी चालताना शरीरात ऊर्जेची कमतरता असते, त्यामुळे खूप लांब चालणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. लांब चालण्यामुळे शरीरावर अतिरिक्त दबाव येतो आणि तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. रिकाम्या पोटी चालण्यापूर्वी, तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार चालण्याची खात्री करा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List