फंद फितूरी करणारे आजही आहेत, राजकीय लाभासाठी दिल्लीचे तळवे चाटत आहेत, संजय राऊत यांची जोरदार टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘छावा’ चित्रपटाचा खास उल्लेख करीत मुघलांनी पाहा संभाजी राजांना कसे मारले, हे पाहा असे सांगत आणि भाजपाला मते द्या असे म्हटल्याचे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा मराठी माणसांना दोन गटात विभागण्यामागे लागली आहे असा जोरदार हल्ला केला आहे.
उबाठाचे खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी पुणे येथील कोरेगाव पार्क स्थित वेस्टीन हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली आहे.शिंदे यांनी सरकारमध्ये कोणतीही इज्जत राहीली नाही. कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो.माझे सर्व निर्णय बदलले जात आहेत. हा सर्व फडणवीस यांच्या कारनाम्याचा पाढा एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या समोर सकाळी ४ वाजता वाचल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की दिल्लीत मराठी साहित्य संमेलन आणि महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला जात आहे. परंतू यात मराठी लोकांचा स्वाभिमान आणि अभिमान हरवला आहे. महाराष्ट्राची सूत्र संपूर्णपणे दिल्लीच्या हातात आहे. आणि महाराष्ट्राचे नेते अमित शाह यांना भेटण्यासाठी पहाटे चार वाजता त्यांची दारात वाट पाहात आहे. शिंदे- शाह यांच्या दरम्यान त्या पहाटे काय झाले होते? इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. सध्या महाराष्ट्रात हेच चालू आहे. मराठ्यांत फूट पडून घरातले लोकच राज्याचे शत्रू बनले आहेत. अशा स्थितीने व्यतिथ झाल्याने शिवाजी महाराजांनी रायगडावर आपला देह त्यागला होता.
आम्ही त्यांची जयंती आणि पुण्यतीथी साजरी केली जात आहे. १९ फेब्रुवारी शिवनेरीवर शिवरायाचा जन्मोत्सव साजरा केला आहे. तेथेही फूटीचे दर्शन झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दरम्यान कटूतेच दर्शन शिवनेरी किल्ल्यावर झाले. आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार याचा आनंद लुटत होते.
राजकीय मोहापायी शरणागत झाला महाराष्ट्र
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर तयार झालेला ‘छावा’ चित्रपट जोरात सुरु आहे. दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘छावा’ चित्रपटाचा विशेष उल्लेख केला आणि मुघलांनी संभाजी राजांना मारले, हे पाहा आणि भाजपला मते द्या. संजय राऊत यांनी सांगितले की ज्या फितुरांनी संभाजी राजाला पकडले आणि स्वराज्याची दुर्गती केली. ते आपल्यातीलच होते आणि त्यांना दिल्लीचा वरदहस्त होता. आज महाराष्ट्राच्या नशीबात पुन्हा तेच दुर्भाग्य आले आहे.
महाराष्ट्राची संपत्ती आणि उद्योग गुजरातला जात आहे. ही गोष्ट आता सर्वसामान्य झाली आहे. पेटेंट मुख्यालय मुंबईत होते. आठ दिवसापूर्वी बातमी आली की पेटेंट कार्यालय देखील दिल्लीला शिफ्ट झाले आहे. जर थेट अहमदाबाद नेले असते तर आणखी तीव्र प्रतिक्रीया आल्या असत्या. त्यामुळे आधी दिल्ली नंतर अहमदाबाद नेले जाईल. बेळगावात मराठी लोकांवर पुन्हा हल्ले होत आहेत. फडणवीस, शिंदे आणि पवार त्रिकूट यावर बोलायला तयार नाही. असे मराठी भाषा दिन आणि पुरस्कार समारंभ बेकार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा मंत्रालयात कामकाज संपूर्णपणे मराठीत होईल असे फर्मान काढले आहे. त्याने काय होणार ? एकनाथ शिंदे यांनी ठाणे मनपाच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचे आदेश दिले आहे. ज्यांनी मराठी भाषेत डिग्री मिळवली आहे.
गुलामीच्या काळात राज्यभाषा नसतानाही मराठी भाषेच्या प्रती प्रेम येथील नागरिकांच्या हृदयात काटोकाट भरले आहे. स्वराज्य आणि स्वातंत्र्याचे वातावरणात स्वभाषेच्या सर्वांगीण विकासाची पर्याप्त आशा आहे. परंतू संघर्षाच्या काळात भाषे प्रती प्रेम आणि स्वाभीमान कडवा होतो.जसा आपण संयुक्त महाराष्ट्र संघर्ष आणि शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी होता असे संजय राऊत यांनी सांगितले.
दिल्लीचे तळवे चाटत आहेत…
मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळाल्याशिवाय मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळणार नाही अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती त्यांनी त्यासाठी तसे कार्य केले. परंतू आज मराठी माणसाला प्रतिष्ठा देणाऱ्या स्थापन झालेल्या शिवसेनेवरच दिल्लीने प्रहार केला आहे.
फंद आणि फितूरी केवळ संभाजी राजांच्या काळातच नव्हे तर आजही आहेत, एवढेच काय सरदेसाईंच्या वाड्यातील अनाजीपंत आणि फितूर सर-कारकून आजही महाराष्ट्रात आहेत आणि राजकीय फायद्यासाठी दिल्लीचे पाय चाटत आहेत. हे चित्र महाराष्ट्रासाठी चांगले नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List