‘छावा’ सिनेमा पाहिल्यानंतर अंकुश चौधरी म्हणाला, ‘मी रडलो, खूप त्रास…’
Chhaava: ‘छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम हा महाराष्ट्राचा गौरव आहे. हा गौरवशाली पराक्रम पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे…’ असं वक्तव्य अभिनेता अंकुश चौधरी याने ‘छावा’ सिनेमा पाहिल्यानंतर केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. तर अभिनेता विकी कौशल याने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अंकुश याने ‘छावा’ सिनेमा पाहिल्यानंतर आलेला अनुभव सर्वांसोबत शेअर केला. सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. असंच काही अंकुश चौधरी याच्यासोबत देखील झालं आहे.
‘छावा’ सिनेमाबद्दल अंकुश म्हणाला, ‘सिनेमा पाहणं एक वेगळा अनुभव आहे. सिनेमा पाहताना मला प्रचंड भरुन आलं, अंगावर काटा आला… जोरात ओरडून बोलावंसं वाटलं, ‘जय भवानी जय शिवाजी…’ माझ्या डोळ्यातून पाणी आलं, मी रडलो… खूप त्रास झाला. येणाऱ्या पिढीलाही महाराजांचा इतिहास कायमस्वरूपी कळेल असं मला वाटतं…’
पुढे अंकुश म्हणाला, ”छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम हा महाराष्ट्राचा गौरव आहे. हा गौरवशाली पराक्रम पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे…’ असं देखील अंकुश चौधरी म्हणाला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त छावा सिनेमाची चर्चा रंगली आहे.
‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने यसुबाईंच्या भूमिकेला न्याय दिला आहे. दोघांनी साकारलेल्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा सलग दोन आठवडे बक्कळ कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने भारतात 400 कोटी रुपयांचा गल्ला जमा केलाय. तर जगभरात सिनेमाने 500 कोटींचा आकडा ओलांडला आहे. यंदाच्या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा ‘छावा’ पहिलाच सिनेमा ठरला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List