‘छावा’च्या क्लायमॅक्सदरम्यान हसणाऱ्या, मस्करी करणाऱ्यांना घडवली अद्दल, व्हिडीओ व्हायरल
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांनंतरही तुफान चर्चेत आहे. अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी थिएटरमधून बाहेर पडत आहेत. मात्र नवी मुंबईच्या कोपर खैराणे थिएटरमध्ये वेगळंच चित्र पहायला मिळालं. तिथल्या बालाजी मूव्हीप्लेक्स थिएटरमध्ये ‘छावा’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्सदरम्यान काही प्रेक्षक हसताना आणि मस्करी करताना दिसल्याने त्यांना सर्वांसमोर माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गणोजी आणि कान्होजी या आपल्याच माणसांनी केलेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात मुघल शासक औरंगजेबाला यश मिळतं. त्यानंतर त्यांचा अतोनात छळ केला जातो. हाच सीन ‘छावा’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ पाहून प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याशिवाय राहत नाही. मात्र याच सीनदरम्यान थिएटरमधील पाच जण हसताना आणि मस्करी करताना दिसले. यावरून संतप्त झालेल्या इतर प्रेक्षकांनी त्यांना थिएटरमध्येच गुडघ्यावर बसून माफी मागण्यास भाग पाडलं.
बालाजी थिएटर, कोपरखैरणे येथे “छावा” चित्रपटातील शेवटच्या दृश्यांवर हे निजामी मराठ्यांचे हे मुस्लिम मावळे हसत होते.
काही छत्रपतींच्या मावळ्यांनी त्यांना अद्दल घडवून पोलीसांच्या ताब्यात दिले.
मुस्लिमांचे लांगूलचालन करणाऱ्या निजामी मराठ्यांना हा व्हिडीओ दाखवा. pic.twitter.com/DJoOMcOwDc
— टवाळखोर कार्ट (@Tawalkhorkart) February 28, 2025
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये एक जण कान पकडून म्हणतोय, “मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो.” पण थिएटरमधील इतर प्रेक्षक त्याला छत्रपती संभाजी महाराजांचीही माफी मागण्यास सांगतात. त्यानंतर तो पुढे म्हणतो, “छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट थिएटरमध्ये सुरू होता. तेव्हा आम्ही हसलो आणि मस्करी केली. त्यामुळे आम्हाला माफी मागण्यास सांगितलं गेलंय.”
लक्ष्मण उतेकर ‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर, सुव्रत जोशी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List