ब्रिटनच्या दोन खासदारांना इस्रायलने प्रवेश नाकारला; घटनेबाबत ब्रिटनने व्यक्त केला निषेध
इस्रायल आणि हमासमधील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. इस्रायलने पुन्हा गाझापट्टीवर हल्ले सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये शातंता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेसाठी ब्रिटनमधील दोन खासदार इस्रायलमध्ये गेले होते. मात्र, इस्रायलने त्यांना प्रवेश नाकारला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. इस्रायलच्या या कारवाईचा ब्रिटनने निषेध व्यक्त केला आहे. तसेच इस्रायलने केलेली ही घटना अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटनमधील सत्ताधारी मजूर पक्षाचे खासदार युआन यांग आणि अब्तिसाम मोहम्मद लंडनहून इस्रायलला गेले होते. मात्र, त्यांना इस्रायलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. तसेच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी सांगितले की इस्रायलने ब्रिटनच्या दोन खासदारांना ताब्यात घेतले आणि त्यांना प्रवेश नाकारला हे अस्वीकार्य आणि चिंताजनक आहे.
इस्रायलकडून पुन्हा सुरू झालेल्या लष्करी कारवाईमुळे तणाव निर्माण झाला आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ओलिसांना मुक्त करण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या गाझामधील आरोग्य मंत्रालयाने सांगितले की गेल्या महिन्यात इस्रायलने पुन्हा जोरदार बॉम्बस्फोट सुरू केल्यापासून 1,249 लोक मारले गेले आहेत.त्यामुळे युद्ध सुरू झाल्यापासून एकूण मृतांची संख्या 50,609 झाली आहे. या परिस्थितीचा आढावा घेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे दोन खासदार इस्रायलला गेले होते. मात्र, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.
इस्रायली सरकारमधील माझ्या समकक्षांना स्पष्ट केले आहे की ब्रिटिश संसद सदस्यांशी असे वागणे योग्य नाही. आम्ही आज रात्री दोन्ही खासदारांशी संपर्क साधत घटनेची माहिती घेत आहोत, असे लॅमी यांनी सांगितले. युद्धबंदी आणि रक्तपात थांबवण्यासाठी, ओलिसांना मुक्त करण्यासाठी आणि गाझामधील संघर्ष संपवण्यासाठी वाटाघाटी आणि चर्चा करण्यासाठी हे खासदार शिष्टमंडळासह इस्रायलमध्ये गेले होते. मात्र, त्यांना प्रवेश नाकारणे अस्वाकार्य असल्याचे सांगत ब्रिटनने आपला निषेध नोंदवला आङे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List