गिरीश महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध, एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवरून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोपांची धूळवड सुरू झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओचा आधार घेत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केला. तर गिरीश महाजन यांनी मी बोललो तर एकनाथ खडसे यांना तोंड काळे करून बाहेर फिरावे लागेल, असा पलटवार केला.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत. या संबंधांची कल्पना भाजप नेते तथा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनाही असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या आधारे खडसे यांनी हा आरोप केला. अमित शहा यांची व आपली भेट झालीच तर मी महाजन यांच्यावरील आरोपांसंदर्भात त्यांना विचारणार असल्याचेही खडसे म्हणाले.
तर एकनाथ खडसेंना तोंड काळे करून बाहेर फिरावे लागेल
एकनाथ खडसे यांनी एक तरी पुरावा द्यावा, मी राजकारण सोडून देईन, असे प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी दिले. मी एकनाथ खडसे यांची एक गोष्ट सांगितली तर लोक त्यांना जोड्याने मारतील, गोष्ट त्यांच्या घरातीलच आहे, तोंड काळे करून त्यांना बाहेर फिरावे लागेल, असा पलटवारही महाजन यांनी केला. खडसे यांनी नुसती तोंडाची वाफ दवडू नये पुरावे द्यावेत, असे आव्हानही महाजन यांनी दिले.
सोशल मीडियावरील व्हिडीओतील गौप्यस्फोट
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भात गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचे या व्हिडीओत म्हटले आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी महाजनांना बोलावून घेत या संबंधांबद्दल विचारले होते, असा दावाही या व्हिडीओत करण्यात आला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या बंगल्यावर 90 कोटी रुपये खर्च केले असून मॉरिशसमधील शेल पंपन्यांच्या माध्यमातून हा व्यवहार झाल्याचे या व्हिडीओत म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List