रेड वाईनचा एकच प्याला आरोग्याला घातक; कॅन्सरचा धोका वाढतो, नव्या संशोधनाचा निष्कर्ष
रेड वाईन आरोग्याला चांगली असते, असे समजून लोक तिचे सेवन करतात, पण खरेच रेड वाईन आरोग्यवर्धक आहे का, हे स्पष्ट करणारा संशोधनपर अहवाल नुकताच समोर आलाय. त्यातून असे दिसून आलेय की, रेड वाईन असो किंवा व्हाईट वाईन, दोन्हीमुळे कॅन्सरचा धोका वाढतो. न्यूट्रीएंट जर्नलमध्ये प्रकाशित 42 संशोधनपर अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. वाईन आणि कॅन्सरसंदर्भात संशोधनावर अधिक प्रकाश टाकताना ब्राऊन युनिव्हर्सिटीचे डॉ. यूनयाँग चो म्हणाले, रेड वाईनमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट कॅन्सरपासून वाचवण्यात काही खास मदत करत नाहीत. रेड वाईन कॅन्सरचा धोका कमी करते, याला कोणताही शास्त्राrय आधार नाही.
व्हाईट वाईन महिलांसाठी धोकादायक ठरू शकते. काही प्रकरणांमध्ये कॅन्सरचा धोका महिलांमध्ये 22 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. (अर्थात अशा प्रकरणात दैनंदिन जीवनातील सनलाईट एक्स्पोझर महत्त्वाचा ठरतो.)
रेड वाईनचा रोजचा एक ग्लास म्हणजे कॅन्सरच्या जोखमीत 5 टक्के वाढ.
दारू कोणत्याही रूपात नुकसानकारक आहे. कॅन्सरपासून वाचायचेय तर दारूपासून दूर रहा, असेही डॉ. यूनयाँग चो यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List