मस्क अमेरिकेतील ‘अदानी’, तिथली जनता रस्त्यावर उतरलीय, अंधभक्तीची नशा उतरल्यावर आपल्याकडंही स्फोट होणार! – संजय राऊत

मस्क अमेरिकेतील ‘अदानी’, तिथली जनता रस्त्यावर उतरलीय, अंधभक्तीची नशा उतरल्यावर आपल्याकडंही स्फोट होणार! – संजय राऊत

हुकूमशाही व मनमानी कारभार, नोकरकपात, बंद करण्यात आलेले विविध सरकारी विभाग, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि अर्थव्यवस्थेची घसरण अशा अनेक मुद्द्यांवरून अमेरिकेत प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. अमेरिकेची जनता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली असून त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी जनता काय करू शकते हे स्वातंत्र्य लढ्यात जसे दिसले तसे आता अमेरिकेत दिसत आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

‘अमेरिकेतील 50 राज्यामधील जनता डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलन मस्क म्हणजे तिकडले अदानी यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. कुणाला वाटत असेल की जे अमेरिकेत घडले ते हिंदुस्थानात घडणार नाही, पण अशा प्रकारचा स्फोट होण्याची भीती मी वारंवार व्यक्त केली आहे आणि ते होणार. अमेरिका जशी मस्कला विकली जात आहे, तसा हा देश मोदी, शहा यांच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जात आहे. वक्फ सुधारणा विधेयक ही त्याची एक पायरी आहे. सर्वकाही अदानीच्या घशात जात आहे, हे स्पष्ट दिसतेय. अमेरिकेप्रमाणे देशातील राज्याराज्यातील लोक रस्त्यावर उतरून क्रांतीचा झेंडा फडाकावल्याशिवाय राहणार नाही’, असेही राऊत म्हणाले.

अमेरिकेच्या धोरणांमध्ये एलन मस्क यांचा हस्तक्षेप वाढत आहे, यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, ‘उद्योगपती लाडका असल्यानेच हस्तक्षेप करू शकतो. जसे दोन किंवा चार उद्योगपती हा देश चालवताहेत, हस्तक्षेप करताहेत, त्यांच्या सोयीने धोरणं बदलली जाताहेत, कामगार कायदे बदलले जात आहेत. आपल्या देशातही लोक रस्त्यावर येणार आहेत. अमेरिकेतील 50 राज्यातील जनता रस्त्यावर उतरली आहे. उद्या व्हाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्प यांना फटकावले तरी आश्चर्य वाटणार नाही. या देशातही हेच घडणार आहे. म्हणून मी वारंवार म्हणतोय की मोदी 2025 चा कार्यकाळ पूर्ण करतील का मला शंका आहे.’

देशात भाजप धर्मांधतेचे विष कालवतोय; जागे व्हा! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले. हिंदुस्थानमधील शेअर बाजारही भूईसपाट झाला. सेन्सेक्स कोसळला, पण परदेशात फिरत आहेत. त्यांना या देशात काय कोसळले याचे काय पडले आहे. ते 20 हजार कोटींच्या आलिषान विमानात फिरत आहेत. परदेशात जाऊन पंतप्रधानांना मिठ्या मारत आहेत आणि त्यांचे अंधभक्त परदेशात त्यांचे काय स्वागत होतंय असे म्हणत टिमक्या वाजवत आहेत. कोणताही पंतप्रधान परदेशात गेला तरी त्याचे असेच स्वागत होते. हे देशाच्या पंतप्रधानांचे स्वागत आहे, मोदींचे नाही, असे राऊत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. तसेच आपल्याला लोकशाही काय हे अमेरिकेतील लोकांकडून शिकावे लागेल. आपण आजही अंधभक्त बनवून फिरत आहोत. अंधभक्तीची नशा उतरली की समजेल की आपल्या खिशात काही राहिले नाही, सर्व अदानी घेऊन गेले, असेही राऊत म्हणाले.

लाल, लाल, लाल…शेअर बाजार भूईसपाट, निफ्टी 1200, सेन्सेक्स 3900 अकांनी कोसळला; लाखो कोटी स्वाहा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नायजेरियावरून आला, साऊथ चित्रपटांमध्ये खलनायक बनला, घराची झडती घेताच पोलीस हादरले नायजेरियावरून आला, साऊथ चित्रपटांमध्ये खलनायक बनला, घराची झडती घेताच पोलीस हादरले
मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत. आमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे, मात्र तरी देखील अशा प्रकरणाला...
IMD Monsoon Update : या वर्षी देशात किती पाऊस पडणार? आयएमडीचा मान्सूनबाबत पहिला अंदाज समोर
Kunal Kamra : कुणाल कामरा याला दिलासा, मद्रास हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
शाहरूखची पत्नी गौरी खानला नेटकरी का म्हणतायत कोमोलिका, व्हँप?; तो व्हिडीओ व्हायरल
कामाचं प्रेशर सहन होईना, सॉफ्टवेअर इंडिनिअरची इमारतीवरून उडी, केरळमध्ये खळबळ
सरकारनेच एन्काउंटरच्या नावाखाली खून केला, बळी मात्र पोलिसांचा गेला; अक्षय शिंदे प्रकरणावरून रोहित पवार यांची टीका
गृहिणींचे बजेट कोलमडणार, घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ