IPL 2025 गुजरातचा ‘सुंदर’ विजय, हैदराबादला नमवले
दमदार सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर गुजरात टायटन्सने सनरायर्झ हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि शेरफन रुदरफोर्ड यांच्या जबरदस्त खेळामुळे गुजरातने 7 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. दरम्यान हैदराबादची पराभवाची मालिका संपायचे नाव घेत नसून हा हैदराबादचा सलग चौथा पराभव आहे.
नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादने 20 षटकात 152 धावा केल्या. हैदराबादकडून एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. चौथ्या स्थानावर आलेल्या नितीश रेड्डी याने 31 धावा केल्या. गुजरात टायटन्सच्या मोहम्मद सिराजने 4 विकेट घेतल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List