जास्त विचार करत नाही, टप्प्यात आला की कार्यक्रम पक्का! जुनं ट्विट आठवत राहुल पिटरनसला भिडला, व्हिडीओ व्हायरल
इंडियन प्रीमियर लीगमध्ये ‘लखनऊ’ सोडून ‘दिल्ली’ला शिफ्ट झालेल्या केएल राहुलची बॅट चांगलीच तळपत आहे. याचा थेट फायदा दिल्ली कॅपिटल्स संघालाही होत आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने 3 पैकी 3 सामने जिंकत गुणतालिकेत पहिला नंबर पटकावला आहे.
दिल्लीच्या शत प्रतिशत विजयी रेकॉर्डमध्ये केएल राहुलचाही मोठा वाटा आहे. 14 कोटी रुपये मोजून दिल्लीने त्याला आपल्या ताफ्यात घेतले असून त्याने पैसा वसूल खेळी केली आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याने 51 चेंडूत 77 धावा फटकावल्या. तीन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. या सामन्यानंतर राहुल आणि दिल्लीचा मेंटॉर केविन पिटरसन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना संपल्यानंतर केएल राहुलने पिटरसनला त्याच्यावर केलेल्या जुन्या ट्विटची आठवण करून दिली. या ट्विटमध्ये पिटरसनने केएल राहुलच्या फलंदाजीची तुलना भिंतीवरील सुकलेल्या रंगाशी केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List