Korean Pop Drama- हिंदुस्थानात कोरियन भाषा शिकण्याची क्रेझ! हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्मातेही धास्तावले – आर माधवन
सध्याच्या घडीला कोरियन गोष्टींनी आपल्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केलेली आहे. कुठेही जा कोरियन ट्रेंडस् हा चर्चेत दिसतो. मग यात कोरियन ब्युटी, फुड आणि के ड्रामा या तिन्हींची चर्चा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी आहे. कोरियन पॉप शोमुळे आता हिंदुस्थानी प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर विभागला गेलेला आहे.
नुकतेच एका मुलाखतीमध्ये, आर माधवन याने ही खंत व्यक्त करुन दाखवली. कोरियन पॉप ड्रामामुळे आपण प्रेक्षक गमावले आहेत अशी भीती माधवनने व्यक्त केलेली आहे.
हिंदुस्थानी तरुणांनी के पॉप म्हणजेच कोरियन पॉप अगदी सहजगत्या स्विकारले आहे. हे केवळ इतक्यावरच थांबलेले नाही तर, आपल्याकडे आता अस्खिलत कोरियन भाषाही बोलताना लोक दिसत आहेत.
हिंदुस्थानातील बहुतांशी राज्यांमधील प्रेक्षक हे के पॉपकडे ओढले गेलेले आहेत. त्यामुळेच आपल्याकडे जे दिसतंय याकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. सध्याच्या घडीला कुमारवयीन मुले केवळ कोरियन पॉपचे चाहते नाहीत. तर कोरियन फूड, कोरियन ब्युटी यांचे चाहते वाढताना दिसताहेत. पालकांना एखादी गोष्ट कळू नये म्हणून मुलांमध्ये कोरियन भाषा ही खाजगी संवादासाठी वापरली जात आहेत. या अशा अनेक गोष्टींची भीती सध्या माधवनला सतावत आहे.
के पॉप संस्कृतीच्या विळख्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीवरही परीणाम झाल्याची खंत माधवन याने या मुलाखतीमध्ये बोलून दाखवली. सध्याच्या घडीला अनेक निर्मात्यांनी के पॉपमुळे आपल्याकडे प्रेक्षक येणार नाहीत याची भीती सतावत आहे.
येत्या काही दिवसात आर माधवन केसरी- २ मध्ये आपल्याला दिसणार आहे. यामध्ये तो अक्षय कुमार आणि अनन्या पांडे यांच्यासोबत काम करताना दिसेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List