भाजपच्या माजी खासदारांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला, सोवळं न नेसल्याने रोखल्याचा आरोप
भाजपचे माजी खासदार राम तडस यांना राम मंदिरातील गर्भगृहात पुजाऱ्यांनी प्रवेश नाकारला आहे. आपण सोवळं आणि जान्हवं घातलं नाही म्हणून मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून रोखलं असा आरोप तडस यांनी लावला आहे. तर दुसरीकडे पुजाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
राम नवमीनिमित्त भाजपचे माजी खासदार राम तडस वर्ध्यातील राम मंदिरात गेले होते. तेव्हा पुजाऱ्यांनी त्यांना गर्भगृहात जाण्यापासून रोखले. दरवर्षी कार्यकर्त्यांसोबत आम्ही गर्भगृहात जातो, पण यंदा पुजाऱ्यांनी आम्हाल रोखलं असे तडस म्हणाले. वाद निर्माण होऊ नये म्हणून आम्ही समंजस भूमिका घेतली आणि पुजाऱ्याला समज दिली असे तडस म्हणाले.
दुसरीकडे मंदिर ट्रस्ट ओमप्रकाश आचार्य यांनी तडस यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. गर्भगृहातील पुजाऱ्याकडे मंदिरातील दागिने होते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तडस यांना प्रवेश नाकारला असे आचार्य म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List