काळाराम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षाला हायकोर्टाने हटवले, पूजेचे पैसे व्याजासह कोर्टात जमा करण्याचे आदेश

काळाराम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षाला हायकोर्टाने हटवले, पूजेचे पैसे व्याजासह कोर्टात जमा करण्याचे आदेश

नाशिक येथील काळारामाच्या पूजेसाठी पैसे मिळत नसल्याने पुजाऱ्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. पूजेसाठी देण्यात येणारी रक्कम 12 टक्के व्याजाने कोर्टात जमा करावी. ही रक्कम किती अपेक्षित आहे याची माहिती याचिकाकर्त्याने ट्रस्टींना द्यावी, असे आदेशात नमूद करत न्यायालयाने ही सुनावणी 8 एप्रिल 2025 पर्यंत तहकूब केली.

सक्षम न्यायिक अधिकाऱ्याची नेमणूक करा

जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश हा ट्रस्टचा अध्यक्ष आहे. ट्रस्टी मंडळातील 11 पैकी 8 सदस्यांनी पुजाऱ्यांना पूजेचे पैसे देण्यास सहमती दर्शवली. ते अध्यक्षांनी ग्राह्य धरले नाही तसेच न्यायालयानेही या मुद्द्यावर एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचेही अध्यक्षांनी पालन केले नाही. त्यामुळे अध्यक्षाने या पदावर काम करणे योग्य नाही. त्यांच्या जागी या पदावर अन्य सक्षम न्यायिक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे आदेश खंडपीठाने जिल्हा प्रधान न्यायाधीशांना दिले.

अध्यक्षांचे आदेश धक्कादायक

पूजेसाठी देण्यात येणारे पैसे बंद केल्याने पुजाऱ्यांनी एक विनंती अर्ज ट्रस्टींकडे केला. हा अर्ज ट्रस्टींनी फेटाळला. पुजाऱ्यांना दिलेले पैसे वसूल करण्यास सांगितले. अध्यक्षांचा हा आदेश धक्कादायक आहे. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांनीही पुजाऱ्यांचे म्हणणे ग्राह्य धरले नाही. डोके न वापरता आयुक्तांनी पुजाऱ्यांचा दावा नाकारला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

काय आहे प्रकरण

नरेश पुजारी व अन्य यांनी ही याचिका केली आहे. 23 नोव्हेंबर 1977 रोजी जिल्हा न्यायालयाने दैनंदिन पूजेबाबत निकाल दिला. पुजाऱ्यांनी काळारामाची दररोज पूजा करावी. पूजेचा खर्च ट्रस्टीने द्यावा, असे या निकालात नमूद करण्यात आले होते. पूजेचा खर्च दररोज देणे शक्य नव्हते. पूजेसाठी महिन्याला 11 हजार रुपये पुजाऱ्यांना देण्याचा ठराव ट्रस्टींनी 17 मार्च 2002 रोजी मंजूर केला. दहा वर्षांनी 2012 मध्ये ही रक्कम वाढवून 20 हजार रुपये करण्यात आली. 2016 मध्ये या रकमेत एक हजार रुपयांची वाढ करून 21 हजार रुपये करण्यात आली. जानेवारी 2020 पासून ट्रस्टीने हे पैसे देणे बंद केले. त्याविरोधात ही याचिका करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भक्तांनी लोकांचे खिसे कापणाऱ्या ‘या’ निर्णयाचे स्वागत करावं, अंबादास दानवे यांचा टोला भक्तांनी लोकांचे खिसे कापणाऱ्या ‘या’ निर्णयाचे स्वागत करावं, अंबादास दानवे यांचा टोला
केंद्र सरकारने आज घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर 50 रुपयांनी वाढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलिंडरवर देखील ही...
Nanded News – आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल, मुद्देमाल जप्त
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा; अमेरिकेच्या कोर्टाने याचिका फेटाळली
ऑर्डर केली व्हेज बिर्याणी, पार्सलमध्ये आली नॉनव्हेज बिर्याणी; रेस्टॉरंट संचालक पोलिसांच्या ताब्यात
मुस्लीमही RSS शाखेत सामील होऊ शकतात – मोहन भागवत
बड्या माशांना पकडायला भीती वाटते का? सुप्रीम कोर्टाने ईडीचे कान उपटले
वाराणसी हादरली! 19 वर्षाच्या तरुणीवर 23 जणांचा बलात्कार, सात दिवस सुरू होते अत्याचार