प्रसिद्धीसाठी काय पण! पत्नीचे दागिने विकून बनवली ‘बेड गाडी’, वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांची कारवाई

प्रसिद्धीसाठी काय पण! पत्नीचे दागिने विकून बनवली ‘बेड गाडी’, वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांची कारवाई

पश्चिम बंगालमधील 27 वर्षीय नवाब शेख या तरुणाने पत्नीचे दागिने विकून एक भन्नाट ‘बेड गाडी’ बनवली. केवळ प्रसिद्धीसाठी बनवलेल्या या अनोख्या निर्मितीमुळे चाकांवर फिरणारा बेड सर्वांचे लक्ष वेधत आहे. मात्र स्थानिक डोमकल पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल हे वाहन जप्त केले आहे. नवाब पेशाने वाहन चालक असून त्याने बनवलेली भन्नाट कार इतर वाहनांसारखी सुसज्ज आहे. यामध्ये गादी, उशा, चादरी, बाजूला ड्रायव्हरची सीट, स्टीअरिंग, आरसा आणि ब्रेकचा पर्याय आहे.

नवाब महिन्याला 9 हजार रुपये कमावतो. मात्र व्हायरल होऊन प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने पत्नीचे दागिने विकून पैसे जमवले. नवाबची पत्नी मेहर नेगरने पतीच्या कार्याला दाद दिली. आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान वाटतो. त्याने खूप मेहनत घेतली, पण काहींनी त्याच्या व्हिडीओची चोरी केली. सरकारने त्याला आता काही आर्थिक मदत करावी अशी आमची इच्छा आहे, असे तिने सांगितले. नवाबकडे संबंधित वाहन चालवण्यासाठी वैध कागदपत्रे किंवा अधिकाऱ्यांच्या परवानगीची प्रत नसल्यामुळे हे वाहन सध्या पोलिसांनी जप्त केले आहे.

2.15 लाख रुपयांचा खर्च

राणीनगर ते डोमकलदरम्यान नवाबने या वाहनाने प्रवास केला असता अनोख्या वाहनाची झलक पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. हे वाहन तयार करण्यासाठी दीड वर्षाहून अधिक वेळ लागला. प्रसिद्धी मिळवणे हे त्याचे स्वप्न होते. यासाठी इंजिन, स्टीअरिंग, इंधन टाकी आणि एका छोट्या कारची बॉडी असे पार्टस् नवाबने खरेदी केले. लाकडी बेड स्ट्रक्चर बांधण्यासाठी त्याने एका सुतारालाही कामावर ठेवले. हा संपूर्ण प्रकल्प करण्यासाठी एकूण 2.15 लाख रुपयांचा खर्च आला, असे नवाब सांगतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भक्तांनी लोकांचे खिसे कापणाऱ्या ‘या’ निर्णयाचे स्वागत करावं, अंबादास दानवे यांचा टोला भक्तांनी लोकांचे खिसे कापणाऱ्या ‘या’ निर्णयाचे स्वागत करावं, अंबादास दानवे यांचा टोला
केंद्र सरकारने आज घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर 50 रुपयांनी वाढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलिंडरवर देखील ही...
Nanded News – आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल, मुद्देमाल जप्त
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा; अमेरिकेच्या कोर्टाने याचिका फेटाळली
ऑर्डर केली व्हेज बिर्याणी, पार्सलमध्ये आली नॉनव्हेज बिर्याणी; रेस्टॉरंट संचालक पोलिसांच्या ताब्यात
मुस्लीमही RSS शाखेत सामील होऊ शकतात – मोहन भागवत
बड्या माशांना पकडायला भीती वाटते का? सुप्रीम कोर्टाने ईडीचे कान उपटले
वाराणसी हादरली! 19 वर्षाच्या तरुणीवर 23 जणांचा बलात्कार, सात दिवस सुरू होते अत्याचार