व्हॉट्सअॅप आणखी होणार रंगतदार
व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनीने आवाज आणि व्हिडीओ कॉल्सच्या अनुभवात आणखी सुधारणा करण्यासाठी पावले टाकली आहेत. व्हॉट्सअॅपने नुकतीच विविध फीचर्सची ओळख करून दिली आहे. नवीन फीचर्सबाबत डब्ल्यूएबीटाइन्फोला व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जनमध्ये म्युट बटण, व्हिडीओ कॉलमध्ये सुधारणा आणि इमोजी फीचर अशा सुधारणा आढळल्या.
म्युट बटण – व्हॉट्सअॅप एक म्युट बटण आणणार असून त्यामुळे वापरकर्त्यांना कॉलच्या नोटिफिकेशनला म्युट करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. या फीचर्समुळे वापरकर्ते कॉल स्वीकारताना त्यांचा मायक्रोफोन म्युट ठेवू शकतील.
व्हिडीओ कॉलमध्ये सुधारणा – कंपनीच्या नवीन अपडेटनुसार वापरकर्त्यांना आता कॉल स्वीकारण्यापूर्वीच त्यांचा व्हिडीओ बंद करण्याची सुविधा असेल. त्यामुळे कॅमेरा बंद करायचा असल्यास कॉल घेण्यापूर्वीच व्हिडीओ बंद करता येईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List