मियॉंने केली उत्तराखंड सरकारची गफलत

मियॉंने केली उत्तराखंड सरकारची गफलत

उत्तराखंडमधील भाजपच्या पुष्कर धामी सरकारने घाऊक प्रमाणात नामबदलाचा निर्णय घेत तब्बल 15 ठिकाणांची नावे बदलली आहेत. मात्र डेहराडूनच्या मियाँवालाचे रामजीवाला असे नावबदल करण्याचा सरकारचा निर्णय अंगलट येण्याची शक्यता आहे. या नावातील मियाँ या शब्दावर भाजपचा आक्षेप होता. मात्र, मियाँ या नावाचा मुघली राजवटीशी काहीही संबंध नसून स्थानिकांनी या नामबदलाला जोरदार विरोध केला आहे.

डेहराडूनमधील बहुतांश रहिवाशी राजपूत समाजातील आहेत. मियाँवाला हा शब्द त्यांच्या अनेक शतकांच्या इतिहासाची साक्ष देणारा आहे. राजपूत समाजातील थोर व्यक्तींना ही उपाधी दिली जात होती. अजुनही इथल्या राजपूत घराण्यांमध्ये काहींचा उल्लेख मियाँ या उपाधीने केला जातो. मियाँवालावासीयांच्या वंशज गढवाली राजांनी जीवावर उदार होत या गावांचे रक्षण केले. गावाचे नाव बदलू नये, अशी मागणी स्थानिकांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IPL 2025 – हार्दिक-तिलकची वादळी खेळी व्यर्थ, RCB ने 10 वर्षांनी “वानखेडे” जिंकलं; मुंबईचा 12 धावांनी पराभव IPL 2025 – हार्दिक-तिलकची वादळी खेळी व्यर्थ, RCB ने 10 वर्षांनी “वानखेडे” जिंकलं; मुंबईचा 12 धावांनी पराभव
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांच्या जल्लोषात पार पडलेल्या अटीतटीच्या लढतीत बंगळुरूने मुंबईचा 12 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. 2015 नंतर...
महागाईने पिचलेल्या जनतेचे या दरवाढीने कंबरडे मोडणार आहे – सतेज पाटील
भक्तांनी लोकांचे खिसे कापणाऱ्या ‘या’ निर्णयाचे स्वागत करावं, अंबादास दानवे यांचा टोला
Nanded News – आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल, मुद्देमाल जप्त
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा; अमेरिकेच्या कोर्टाने याचिका फेटाळली
ऑर्डर केली व्हेज बिर्याणी, पार्सलमध्ये आली नॉनव्हेज बिर्याणी; रेस्टॉरंट संचालक पोलिसांच्या ताब्यात
मुस्लीमही RSS शाखेत सामील होऊ शकतात – मोहन भागवत