परदेशी महिलेकडून 11 कोटींचे कोकेन जप्त, पोटातून काढल्या 100 कॅप्सूल
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्राझील देशाच्या महिलेला अटक केली. तिच्या पोटातून 100 कोकेन असलेल्या कॅप्सूल जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या कॅप्सूलची किंमत सुमारे 11 कोटी रुपये इतकी आहे.
गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर अमली पदार्थ तस्करीचे प्रकार वाढू लागले आहेत. एक परदेशातील महिला ड्रग तस्करी करणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्या माहितीनंतर डीआरआयच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला. ती महिला विमानतळावर आली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने तिला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर तिने पोटात कोकेन मिश्रित कॅप्सूल असल्याचे सांगितले.
त्यानंतर तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्या पोटातून 100 कोकेन असलेल्या कॅप्सूल जप्त केल्या. जप्त केलेल्या कॅप्सूलमध्ये 1096 ग्रॅम कोकेन होते. त्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजरात किंमत सुमारे 11 कोटी रुपये इतकी आहे. कोकेन तस्करीप्रकरणी तिच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. विमानतळावरून बाहेर पडताच ती ते कोकेन एकाला देणार होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. ती ते कोकेन कोणाला देणार होती, याचा तपास डीआरआय करत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List