लाहीलाही! पारा चाळिशी पार, पुढील पाच दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता
होळीनंतर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. राज्यात पारा चाळिशी पार पोहोचला असून कडक उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. मुंबईत तापमान 34 अंशांच्या पुढे गेले असून पुढील पाच दिवस राज्यात तापमान स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे. कमाल तापमान 40 ते 41 अंश पोहोचले असून नागरिकांसह प्राण्यांनाही उन्हाचा तडाखा सोसावा लागत आहे. अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट तर नागपूर, वर्धा अमरावती जिह्याला यलो अलर्ट देण्यात आला होता. अकोल्यात आज 41.5 तापमानाची आज नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपुरात 41.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रातही तापमान वाढले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अधिक तापमान नोंदवले गेले आहे.
राज्यातील तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई उपनगर – 34.5, मुंबई शहर – 33.0, पालघर – 35.0, पुणे – 38.7, चंद्रपूर – 41.4, सोलापूर – 41.1, वर्धा – 41.0, अकोला – 40.9, अमरावती – 40.6, नागपूर – 40.4, यवतमाळ – 40.0, वाशीम – 39.8, परभणी – 39.8, जळगाव – 39.5, गडचिरोली – 39.4, सांगली – 39.2, छत्रपती संभाजीनगर – 38.7, जालना – 38.6, लातूर – 37.8, बुलढाणा – 37.6, गोंदिया – 37.6, नगर – 37.9, सातारा – 37.9, नाशिक – 36.3
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List