Sindhudurg News – मुंबई-गोवा महामार्गावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलरचा अपघात

Sindhudurg News – मुंबई-गोवा महामार्गावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलरचा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरील एका वळणावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलरचा अपघात झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलर महामार्गाच्या बाजूच्या जंगलात जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पाच जणांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात कासार्डे ब्राम्हणवाडीनजीक मेढेदेव येथे शनिवारी (15 मार्च 2025) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर येथून एकाच कंपनीत काम करणारे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मिळून 18 जण सिंधुदुर्ग व गोवा पर्यटनासाठी जात होते. कासार्डे ब्राम्हणवाडीनजीक मेढेदेव येथील वळणावर त्यांची ट्रॅव्हलर आली असता चालकाला डुलकी आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रॅव्हलर सरळ गोव्याच्या दिशेने जात असताना दुभाजक व मुंबईकडे जाणारा लेन पार करीत सरळ तीस ते चाळीस फूट महामार्गालगत असणाऱ्या जंगलात जाऊन आदळली. या अपघात जीवितहानी झाली नाही. गाडीतील 18 प्रवाशांपैकी अश्विनी गणेश भगत (वय 38), सचिन नवनाथ चिंचकर (43), श्रावणी भिमराव बिरादार (20), दानेश्वरी रमेश टाकवणे (22), अभिषेक वैभव बाबर (20) या पाच जणांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना स्थानिकांच्या मदतीने कासार्डे येथील 108 रुग्णवाहिकेचे डॉ. अनिरुद्ध मुद्राळे, चालक रूपेश राणे यांनी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल रुपेश गुरव यांनी घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कर्जत- जामखेडमध्ये रंगणार  ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा, 26 ते 30 मार्चदरम्यान आयोजन  कर्जत- जामखेडमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा, 26 ते 30 मार्चदरम्यान आयोजन 
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा कर्जत-जामखेड मतदारसंघातील कर्जत येथे 26 ते 30 मार्च या कालावधीत पार...
लख लख सोनेरी तेजाची न्यारी दुनिया! सोने 91 हजारांवर… लवकरच लाखावर जाणार!
लाहीलाही! पारा चाळिशी पार, पुढील पाच दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता
धरणांमध्ये उरला अर्धाच पाणीसाठा; मेमध्ये टँकर माफियांचे फावणार, महाराष्ट्रावर भीषण पाणीटंचाईचे सावट
परीक्षण – थरारक आणि रक्त गोठवणारं!
डोक्याला शॉट… आपण रोज दूध नव्हे कपड्याचा साबण पितोय! राज्य सरकारची विधानसभेत कबुली… होय, दुधात भेसळ होतेय
अभियंत्यांनी रात्रीही रस्त्यांच्या कामावर उपस्थित राहावे! अतिरिक्त पालिका आयुक्तांचे निर्देश