वाढवणच्या समुद्रातील खनिज तेल सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखले; परवानगी न घेताच घुसखोरी, भूमिपुत्रआक्रमक

वाढवणच्या समुद्रातील खनिज तेल सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखले; परवानगी न घेताच घुसखोरी, भूमिपुत्रआक्रमक

पालघरच्या समुद्रात असलेल्या खनिज तेलाच्या खजिन्यावर तेल कंपन्यांची वाकडी नजर वळली आहे. हे तेलाचे साठे नेमके कुठे आहेत हे शोधण्यासाठी एका खासगी कंपनीने कोणत्याही परवानग्या न घेता थेट वाढवणच्या समुद्रात घुसखोरी केली, ही बाब कळताच मच्छीमारांत संतापाची लाट उसळली. या मच्छीमारांनी बोटीतून जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि सर्वेक्षण बंद पाडले.

विनाशकारी वाढवण बंदराला गेल्या 10 वर्षांपासून मच्छीमारांनी कडाडून विरोध केला आहे. मात्र हा विरोध मोडून काढत केंद्र सरकारने वाढवण बंदराला परवानगी दिली आणि त्याचे कामही सुरू केले. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संतापाची खदखद असतानाच आज वाढवणच्या समुद्रात असलेल्या खनिज तेलावर डोळा ठेवून कोस्टल मरीन कन्स्ट्रक्शन अॅण्ड इंजिनीयरिंग लिमिटेड या पंपनीने कोणत्याही आवश्यक परवानग्या न घेता थेट समुद्रात जाऊन सर्वेक्षण सुरू केले. भूमिपुत्र मच्छीमारांना याची माहिती मिळताच कोळीवाडय़ांमध्ये संतापाची लाट उसळली आणि मच्छीमारांनी बोटींवर स्वार होऊन सर्वेक्षणस्थळ गाठले. तुम्हाला इथे येण्याची परवानगी कोणी दिली.  तुमच्या सर्वेक्षणामुळे समुद्रातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. आधी परवानग्या दाखवा मगच समुद्रात पाऊल ठेवा, असा सज्जड दम मच्छीमारांनी दिला. त्यानंतर सर्वेक्षण थांबवून पंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पळ काढला.

खनिज तेल रिफायनरीही ठरणार घातक

वाढवण बंदरापाठोपाठ येथील समुद्रात 7 हजार 800 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये तेलाचे साठे आढळून आले आहेत. त्याचा शोध लागताच खनिज तेल रिफायनरी उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही रिफायनरीदेखील विनाशकारी ठरणार असून वाढवण बंदरविरोधी संघटना पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाचा इशारा
दिला आहे.

निसर्गाचा समतोल ढासळणार

कोटय़वधी रुपये खर्च करून वाढवणवासीयांच्या माथी एकीकडे विनाशकारी बंदर लादले असतानाच आता दुसरीकडे कच्च्या तेलाचे उत्पादन सुरू करण्याचा घाट घातला आहे. तसे झाल्यास समुद्र व परिसरातील किनारपट्टीचा नैसर्गिक समतोल ढासळेल, असा इशारा पर्यावरणतज्ञांनी दिला आहे.

पोलिसांनी बजावली कारणे दाखवानोटीस

वाढवणच्या समुद्रात विनापरवानगी सर्वेक्षण सुरू असल्याची बाब  मच्छीमारांनी स्थानिक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कोस्टल मरीन कन्स्ट्रक्शन अॅण्ड इंजिनीयरिंग या पंपनीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीला उत्तर देईपर्यंत सर्वेक्षण करण्यास मनाईदेखील करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यात उष्णतेचा पारा 40 पार, मुंबईत उकाडा वाढणार की कमी होणार ? पुण्यात उष्णतेचा पारा 40 पार, मुंबईत उकाडा वाढणार की कमी होणार ?
उन्हाळा आता तोंडावर आला असून हळूहळू उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्यातच आता...
सर्वसामान्यांना महागाईचा तडाखा, मटणालाच नाही तर दुधाला दरवाढीची उकळी, ग्राहकांचा खिशावर बोजा
आधी ‘जब वी मेट’साठी करीना नाही म्हणाली, पण ‘या’ व्यक्तीने मनवताच तयार झाली
आधी ब्रेकअपची चर्चा, नंतर पार्टीत एकत्र, तमन्ना भाटिया- विजय वर्माचा व्हिडिओ पाहाच
या सुपरस्टारच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू, 10 वर्षे वाट पाहिली, 53 व्या वर्षीही एकटी
Aamir Khan : इरफान पठाणच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठीही आमिर-गौरी दिसले एकत्र ! Video व्हायरल
पार्किंगच्या वादातून मारहाण; शास्त्रज्ञाचा मृत्यू, बहिणीने किडनी देऊन वाचवला होता जीव