सोशल मीडियावरून सुरू होते सेक्स रॅकेट, चार तरुणींची केली सुटका
सोशल मीडियावरून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी कारवाई करून वृद्धाला अटक केली. चार तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी सुधारगृहात केली आहे. एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
एक वृद्ध हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो तरुणींना हॉटेल आणि लॉजवर पाठवत असायचा. त्या माहितीची पोलिसांनी सत्यता पडताळली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी त्या वृद्धाला संपर्क साधला. अॅक्टर तरुणीमागे तीन लाख रुपये द्यावे लागतील असे त्याने सांगितले. या व्यवहारानंतर त्या तरुणींना पवई येथील हॉटेलमध्ये घेऊन येण्यास सांगितले. त्या वृद्धाने बोगस ग्राहकाला तरुणीचा फोटो पाठवला.
आर्थिक व्यवहार झाल्यावर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. छापा टाकून पोलिसांनी वृद्धाला अटक केली, तर त्या चार तरुणींची पोलिसांनी सुटका केली. अटक वृद्ध हा ऑनलाईन पद्धतीने सेक्स रॅकेट चालवत असायचा. त्याला एक जण मदत करत होता. त्याच्या संपर्कात काही मॉडेल होत्या. अर्धी रक्कम तो तरुणी, मॉडेल याना द्यायचा, तर अर्धी रक्कम स्वतःकडे ठेवायचा. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्या चार तरुणींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले. पोलिसांनी 8 महागडे मोबाईल, 5 हजार रुपये जप्त केले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List