मराठी शाळा वाचविण्यासाठी शिक्षक सेनेचे आंदोलन
15 मार्च 2024 च्या शासन निर्णयामुळे राज्यातील अनेक मराठी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तसेच हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त होतेय. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेने मराठी भाषा गौरव दिनी राज्यभरातील उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन केले.
मुंबईतील पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालयासमोर झालेल्या प्रमुख आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्राचे शिक्षक सेनेचे अध्यक्ष-आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘मराठी शाळा बंद पडणे म्हणजे फक्त शिक्षकांवरचा अन्याय नाही, तर मराठी भाषेच्या अस्तित्वावर घाला आहे. शाळा टिकवण्यासाठी आणि शिक्षकांचे हक्क वाचवण्यासाठी जोपर्यंत हा जीआर रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.’
उत्तर विभागातही आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी केले. 15 मार्च 2024 चा शासन निर्णय मागे न घेतल्यास पुढील टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ज. मो. अभ्यंकर यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List