ट्रम्प यांच्या मनमानीविरोधात अमेरिका रस्त्यावर उतरली; 50 राज्यातील 1200 शहरात तीव्र निदर्शने

ट्रम्प यांच्या मनमानीविरोधात अमेरिका रस्त्यावर उतरली; 50 राज्यातील 1200 शहरात तीव्र निदर्शने

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा अमेरिकेलाही फटका बसत आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. 2020 नंतर बाजारातील एका दिवसातील ही सर्वा मोठी घसरण आहे. अमेरिकेला फटका बसत असूनही ट्रम्प त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. तसेच टॅरिफप्रमाणेच त्यांच्या अनेक धोरणांबाबत अमेरिकेच्या जनतेत नाराजी आहे. या नाराजीच्या शनिवारी उद्रेक झाला आणि ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकी जनता रस्त्यांवर उतरली. 50 राज्यातील 1200 शहरांमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

ट्रम्प विक्षिप्त असून त्यांच्या मनमानी कराभाराचा निषेध असो, अमेरिकेत राजेशाही नाही, आम्ही हा वेडेपणा खपवून घेणार नाही, अमेरिकेचे नुकसान करणारे ट्रम्प आणि मस्क चालते व्हा असे फलक हातात घेत लाखो नागरिक रस्त्यांवर उतरले होते. अमेरिकेच्या अनेक शहरात रॅली निघाल्या, जिथे निदर्शकांनी ट्रम्प आणि त्यांच्या आक्रमक व्यापार धोरणांना विरोध केला.

डोनाल्ड ट्रम्प आणि ऐलॉन मस्क यांनी सरकारी खर्च कमी करण्याच्या नावाखाली अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. आता टॅरिफ धोरणांमुळे ते देशातील शेअर बाजार आणि उद्योगधंदे बंद करतील, अशा भावना व्यक्त करत जनतेने संताप व्यक्त केला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फुटीर धोरणांना विरोध करण्यासाठी शनिवारी लाखो निदर्शकांनी अमेरिकेच्या प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर गर्दी केली होती.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यापासून ते व्यापारी शुल्क आणि नागरी स्वातंत्र्यांचे ऱ्हास करण्यापर्यंतच्या ट्रम्प यांच्या धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला. वॉशिंग्टन, न्यू यॉर्क, ह्युस्टन, फ्लोरिडा, कोलोरॅडो आणि लॉस एंजेलिससह इतर प्रमुख शहरात रॅली काढत नागरिक रस्त्यांवर उतरले होते. उद्योजकांचा एक गट आपल्या देशावर नियंत्रण ठेवत आहे. हे चांगले नाही, असे एका आंदोलनकर्त्याने सांगितले.

टॅरफ धोरण हा आर्थिक वेडेपणा असून तो आपल्याला जागतिक मंदीमध्ये ढकलणार आहे. ट्रम्प यांनी देशासमोर मोठे संकट निर्माण केले आहे. आपल्या देशाला एक विक्षिप्त राष्ट्राध्यक्ष लाभला आहे. ट्रम्प आणि मस्क हे दोघेही देशाला संकटात ढकलत आहेत. देशातील कोणत्याही नागरिकाला अर्थव्यवस्थेसमोर संकट उभे करणारा हुकूमशहा नको आहे, असा संतापही निदर्शकांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळी ट्रेक तरुणांच्या अंगलट…किल्ल्यावर रस्ता भरकटला, उष्माघाताने तरूणी बेशुद्ध; अखेर… उन्हाळी ट्रेक तरुणांच्या अंगलट…किल्ल्यावर रस्ता भरकटला, उष्माघाताने तरूणी बेशुद्ध; अखेर…
उन्हाळ्याची सुट्टी लागली की अनेकांचे बाहेर फिरण्याचे तर काहींचे ट्रेकिंगचे प्लान ठरतात. मुंबईतील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही तरूण-तरूणींच्या ग्रुपने देखील असाच...
मानसी घोष ठरली ‘इंडियन आयडॉल 15’ची विजेती; बक्षीस म्हणून मिळाले तब्बल इतके लाख रुपये
आयुष्यमान खुरानावर दु:खाचा डोंगर, ७ वर्षांनंतर पुन्हा पत्नीच्या आयुष्यात परतला तो भयानक आजार
‘फक्त पैशांसाठी म्हाताऱ्यासोबत लग्न केलंय…’, अनेकांना जुहीला मारले टोमणे, पण सत्य फार भावुक करणारं
“प्रत्येक घटस्फोटात तिसरी व्यक्ती..”; मराठमोळ्या अभिनेत्रीशी विभक्त झाल्यानंतर पूर्व पतीची नेटकऱ्यांना विनंती
‘सकाळी मी उठलो तेव्हा कळालं ती…’, एकीकडे शाहरुखचे स्टार होण्याचे स्वप्न, दुसरीकडे अभिनेत्रीचा खिडकीतून पडून मृत्यू
‘ओवर एक्टिंग की दुकान’, रश्मिका मंदानाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते भडकले; केलं ट्रोल