हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि देश विकायचा, सारं गिळायचं; वक्फ बोर्ड बिलावरून संजय राऊत यांचा घणाघात
भविष्यामध्ये मुस्लिमांच्या या सगळ्या संपत्त्या भाजपच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जातील असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि देश विकायचा, सारं गिळायचं अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या इमारतीवरती उद्योगपतींची अलिशान घर उभी आहेत. ती कायदेशीर करण्यासाठी बिल आणले आहेत. हे मोठे उद्योगपती कोण तुम्हाला माहिती आहे. 2014 पासून 2024 पर्यंत मोदींच सरकार आहे. 2014 ते 2024 या काळामध्ये या सरकारला गरीब मुसलमान वक्फ बोर्डातला घोटाळा दिसला नाही. 2014 ते 2024 पर्यंत देशातली सगळी संपत्ती विकून झाली, सार्वजनिक संपत्ती विकून झाली. उद्योगपतींच्या असं लक्षात आलं की आता विकायला काही उरलं नाही. मग यांचं लक्ष या वक्फ बोर्डाच्या संपत्तीकडे गेलं, आता हे विकलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे विधेयक आणलं आहे. सगळा देश विकून झाल्यावरती त्यांना वक्फ बोर्डाची दोन लाख कोटी रुपयांची संपत्ती दिसली. ही संपत्ती आपल्याच माणसांना मिळायला पाहिजे आणि मग त्यांनी हे वक्फ बोर्डाचं विधेयक सुधारणा विधायकच्या नावाखाली आणलं. या संपत्तीचा गोर गोर गरिबांना काय फायदा होणार आहे? भविष्यामध्ये मुस्लिमांच्या या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत हे सत्य आहे. पण हिंदुत्वाच नाव द्यायचं आणि गिळायचं, बाकी काही नाही असे संजय राऊत म्हणाले.
मी जे बोलतोय ते खरं आहे का खोट आहे त्यांनी आता सांगाव. माझ्यासमोर अमित शहा लोकसभेतल्या भाषणात सांगितलं ना? त्यांचं भाषण पत्रकारांनी नीट ऐकलं पाहिजे. अमित शहा असं म्हणाले की 2025 पर्यंत ज्या मशिदी, मदरसे आणि दर्गे आहेत आम्ही त्यांना हात लावणार नाही. किती महान विचार दिला आम्ही त्यांना हात लावणार नाही. पण रिक्त जमिनी आम्ही विकू आणि गरीब मुसलमानांना पैसे देऊ. शक्य आहे का? म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे. म्हणजे खरेदी विक्री आली. बेचेंगेवर खरीदने की बात आ गई आहे ही त्यांच्या डोक्यातला मळमळ आहे, देश बेचेंगे और व बोर्ड की प्रॉपर्टी भी बेचेंगे हे अमित शहानी स्पष्ट केलं आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही देश विकला. आता व वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टी, भविष्यात चर्चे ख्रिश्चनांच्या, जैनांच्या, पारशी समुदायाच्या प्रॉपर्टी विकतील असेही संजय राऊत म्हणाले.
भारतीय जनता पक्षाची जी स्थापना आहे ती आमच्या समोर झाली. जनता पक्षाचे विघटन झाल्यावर 1978 नंतर या पक्षाची स्थापना झाली आणि मूळ शिवसेना जी आहे ही भारतीय जनता पक्षाला सीनियर आहे. आमचा जन्म त्यांच्या आधी झालाय. शिवसेनेचा 60 च्या दशकात आणि हे 78 साली जन्माला आले. त्याच्यामुळे आमच्या समोर यांचा जन्म झालेला आहे. पण तेव्हा एका उदात्त हेतूने यांचा जन्म झाला ज्यांनी हा पक्ष जन्माला घातला ते आज शहाजहानसारखे बिचारे तुरुंगात आहेत, लालकृष्ण आडवाणी ते पक्षाचे संस्थापक मुरली मनोहर जोशी, अटलजी गेले आणि आता पक्ष दुसऱ्याच लोकांनी हायजॅक केला. हा खरा भारतीय जनता पक्ष नाही नाही असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
कोण दीपक केसरकर ते मोदींची उद्धव ठाकरे यांची भेट घडवणार? य़ा ठाकरे कुटुंबाचे मोदींशी वर्षानुवर्षाचे संबंध आहेत, त्यात केसरकरांची गरज आहे. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा व्हायची. हे नातं तेव्हा होतं, ते केसरकरांमुळे होतं का? केसरकर हिंदुत्ववादी आणि भाजपचे कधी झाले? केसरकर खोटं बोलत आहेत. मोदी आणि आमच्यात आता मतभेद आहेत, पण संबंध आजही आहेत. यासाठी केसरकरांची गरज लागत असेल तर आम्हाला राजकारण सोडावं लागेल असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची हे एकच एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट होता अशी टीका संजय राऊत यांनी लगावला. पण शिंदेंच्या या ड्रीम प्रोजेक्टला यश मिळाले नाही. काही आमदार खासदार गेले असतील शिवसेना मजबूतीने आजही उभी आहे असेही संजय राऊत म्हणाले. UBT मध्ये B आहे आणि B म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्याचं काय हे त्यांना काढता येणार नाही. तो बाप आहे तो काढता येणार नाही तोवर एसंशि काही करू शकत नाही. देवेंद्र फडवणीस या देशातले खूप श्रीमंत राजकारणी आहेत, प्रमोद महाजनजी एके काळी होते असं म्हणायचे आता सध्या ते आहेत असं लोक सांगतायत. त्याशिवाय काय भाजपा चाललाय? मराठी माणूस आहे श्रीमंत झाला पाहिजे मग ते फडणवीस असतील किंवा आमचा एखादा साधा कार्यकर्ता असो. भारतीय जनता पक्षानं गरिबीवर बोलू नये, भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत जेवढा खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा अख्खा अर्थसंकल्प पूर्ण होईल असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List