‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. या मालिकेत किर्ती ही रॉकी आणि संपदाला एकत्र पाहते आणि लक्ष्मणला रॉकी आणि शिवाविरुद्ध भडकावते.
किर्ती आणि सुहासच्या मदतीने लक्ष्मण गुंडांच्या मदतीने रॉकीला अमानुष मारहाण करायला लावतो. त्यामुळे त्याची IAS ट्रेनिंग चुकते. शिवाला रॉकीवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळते.
या कटामागचा खरा सूत्रधार कोण हे शोधायचं शिवा ठरवते. गुंड लक्ष्मणचं नाव घेतात. त्यामुळे देसाई हाऊसमध्ये मोठा संघर्ष होतो. मात्र, लक्ष्मण शिवालाच दोषी ठरवतो आणि म्हणतो "शिवा, तुझ्यामुळेच रॉकी या घरात आला आणि संपदाच्या प्रेमात पडला."
सीताई शिवावर घर मोडल्याचा आरोप करते. आता संपूर्ण देसाई कुटुंब शिवाच्या विरोधात आहे. पण आशु तिच्या पाठीशी उभा राहतो. लक्ष्मण संपदाच्या लग्नाची घोषणा करतो. भाऊ आणि आशु लक्ष्मणला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List