झारखंड हादरले! पेंढ्याला आग लागली, चार मुलं होरपळली
झारखंडच्या चाईबासा जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली. गीतिलीपी गावात एका घराबाहेर असलेल्या पेंढ्याला आग लागली. यावेळी त्या पेंढ्यात खेळत असलेल्या चार मुलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चाईबासा जिल्ह्यातील जगन्नाथपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गीतिलीपी गावात घडली. सोमवारी (17 मार्च) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर असलेल्या पेंढ्याच्या ढिगाऱ्याजवळ चार मुलं खेळत होती. यावेळी अचानक त्या पेंढ्यांच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. त्यामुळे चारही मुलांचा या आगीत होरळपून मृत्यू झाला.
दरम्यान आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ तेथील आग आटोक्यात आणली. यानंतर पोलिसांनी चारही मुलांचे जळालेले मृतदेह काढून ते शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List