Oscar Awards 2025 Live: अँड द ऑस्कर गोज टू.. अवघ्या काही तासांत जाहीर होणार विजेता
Oscar Awards 2025 Live: “अँड द ऑस्कर गोज टू…” हे शब्द ऐकण्यासाठी कलाविश्वातील प्रत्येक कलाकार आतूर असतो. चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित 97 वा ‘अकॅडमी अवॉर्ड्स’ म्हणजेच ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडतोय. यंदा कॉमेडियन आणि पॉडकास्टर कॉनन ओब्रायन या सोहळ्याचं पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार आहे. याआधी त्याने 2002 आणि 2006 मध्ये एमी अवॉर्ड्सचं सूत्रसंचालन केलं होतं. 2025 या वर्षातील ऑस्कर पुरस्काराबद्दल कलाकारांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अवघ्या काही तासांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता आणि अभिनेत्रीची घोषणा होईल. अनोरा, द ब्रुटलिस्ट, अ कम्प्लिट अननोन, कॉनक्लेव्ह, ड्युन: पार्ट टू, एमिलिया पेरेझ, आय एम स्टिल हिअर, निकेल बॉईज, द सबस्टन्स आणि विकेड हे चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित झाले आहेत. या पुरस्कार सोहळ्याविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा..
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List