Video: मराठमोळ्या सयाजी शिंदेंचे पाकिस्तानातही चाहते? पाहा त्यांना पाहून काय म्हणाले…
मराठी, हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणून सयाजी शिंदे ओळखले जातात. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरल्याचे दिसत आहे. सयाजी शिंदे यांचे चाहते केवळ भारतातच नसून तर जगभरात आहेत. त्यांनी पाकिस्तानी चाहत्यांशी संवाद साधला आहे. या चाहत्याने थेट त्यांना पाकिस्तानला येण्याचे आमंत्रण दिले आहे. सयाजी शिंदे यांनी स्वत: पाकिस्तानी चाहत्यांशी गप्पा मारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सयाजी शिंदे हे नुकताच अजरबैजान या देशात गेले होते. तेथे फिरत असताना त्यांचे काही पाकिस्तानी चाहते भेटले. या चाहत्यांशी सयाजी शिंदे यांनी गप्पा मारल्या आहेत. सयाजी शिंदे यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाकिस्तानी चाहत्यांशी गप्पा मारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते स्वत: बोलताना दिसत आहेत की, ‘हे माझे पाकिस्तानचे चाहते.’ पुढे ते पाकिस्तानी चाहत्याला माझे कोणते कोणते सिनेमे पाहिले आहेत? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर त्या चाहत्याने, ‘मी तुमचे खूप सारे सिनेमे पाहिले आहेत. खास करून तामिळनाडू मध्ये बनत असलेले. संजू सिनेमा मला विशेष आवडला. एक तुमचा महेश बाबूसोबतचा सिनेमा मला जास्त आवडला ज्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री बनले आहेत’ असे उत्तर दिले आहे.
या व्हिडीओमध्ये पुढे सयाजी शिंदे हे विमानतळावर एका पाकिस्तानी चाहत्याशी संवाद साधनाता दिसतात. त्यामध्ये चाहता म्हणतो, ‘आम्ही तुमचे चित्रपट पाहात असतो. खूप आनंद होतो तुमचा चित्रपट पाहाताना. तुम्हाला भेटून मजा आली. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. कधीही पाकिस्तानमध्ये आलात तर आम्ही तुमचे आनंदाने स्वागत करू.’ त्यावर सजायी शिंदे म्हणतात की ‘हैदराबादमध्ये बसून आम्ही सिनेमे करतो आणि तुम्ही पाकिस्तानमध्ये बसून ते पाहाता हे ऐकून आनंद झाला.’
सयाजी शिंदे यांनी हा व्हिडीओ शेअर करत, ‘कलेला कोणत्याही सीमा नसतात. अजरबैजानमधील पाकिस्तानी चाहत्यांसोबतचे सयाजी शिंदे यांचे हृदयस्पर्शी क्षण. सिनेमावरील खरे प्रेम आपल्या सर्वांना एकत्र आणते’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने, ‘माझ्या मातीतला मातीशी नाळ जुळलेला माझा मराठी कलावंत’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘खरा हिरो’ अशी कमेंट केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List