औरंगजेबाच्या कबरीबाबत फडणवीसांनी केलं वक्तव्य, दिली महत्त्वाची माहिती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने भिवंडी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराचे उद्धाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाषण करताना फडणवीस यांनी सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद सुरू आहे त्यावर भाष्य केलं. औरंगजेबाच्या कबरीला सरकारने का संरक्षण दिलंय याचं कारण सांगितलं.
”महाराष्ट्रात महिमा मंडळ होईल तर फक्त शिवरायांचे औरंगजेबाची कधीच उदात्तीकरण होणार नाही. औरंगजेबाच्या कबरीला देशाच्या पुरातत्व खात्याने Archaeological Survey of India (ASI) पन्नास वर्षांपूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील या कबरीला संरक्षण देणं भाग आहे. मात्र महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List