.. आणि मिंधेंचे मंत्री भरत गोगावलेंचा चेहरा खर्रकन उतरला
मुख्यमंत्री महाडमध्ये असल्याने रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आज तरी आपले नाव जाहीर होईल या भ्रमात असलेले मिंर्धेचे मंत्री भरत गोगावले यांचा चेहरा खर्रकन उत्तरला. पत्रकारांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून प्रश्नांची सरबत्ती केल्यावर मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही रायगडचे पालकमंत्री आहेत, असे सांगत फडणवीसांनी वेळ मारून नेली आणि मग उतरलेल्या चेहऱ्यानेच गोगावले कार्यक्रमामध्ये वावरत होते.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. आज चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालयाच्या कोनशिलाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाडमध्ये झाला. मुख्यमंत्री महाडमध्ये येणार असल्याने आज पालकमंत्री पदावर भाष्य करतील, असा विश्वास मिंध्यांचे मंत्री भरत गोगावले यांना होता. त्यांनी काही पत्रकारांनाही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा असे सुचवले होते. पालकमंत्री पदाचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर फडणवीसांनी मी स्वतः आणि एकनाथ शिंदे व अजित पवार हे रायगडचे पालकमंत्री आहोत, असे सांगून गोगावलेंचा पुरता भ्रमनिरास केला.
मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून प्रवास करूनही फायदा नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीतून भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांनी प्रवास केला. जसा नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद फडणवीसांनी मिटवला तसा रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद फडणवीस आजच मिटवतील, अशी आशा गोगावलेंना होती. पण तसे काही घडलेच नाही आणि गोगावले निराश झाले
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List