लख लख सोनेरी तेजाची न्यारी दुनिया! सोने 91 हजारांवर… लवकरच लाखावर जाणार!

लख लख सोनेरी तेजाची न्यारी दुनिया! सोने 91 हजारांवर… लवकरच लाखावर जाणार!

सण-उत्सव, लग्नसराईचा कालावधी तोंडावर असतानाच सोन्याला पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे. मोदी सरकारच्या काळात दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असून गेल्या काही तासांत सोन्याचे दर हजार रुपयांनी वधारले आहेत. प्रतितोळा सोने 91 हजारांवर पोहोचले असून डोनाल्ड ट्रम्प सरकारने टॅरिफ दर वाढवल्याने येत्या काळात सोने लाखावर जाण्याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षभरापासून सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रतिऔंस 3,000 डॉलर्सच्या पुढे गेला असून देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दराने प्रति 10 ग्रॅम 91 हजार 464 रुपयांवर उडी घेतली आहे. रशिया-युक्रेन युद्ध, त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरू केल्याने बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.

पाच वर्षांत सोन्याचे दर गगनाला भिडले

2021 – 48 हजार 720 रुपये प्रतितोळा
2022 – 52 हजार 670 रुपये प्रतितोळा
2023 – 65 हजार 330 रुपये प्रतितोळा
2024 – 77 हजार 913 रुपये प्रतितोळा
2025 – 91 हजार 464 रुपये प्रतितोळा

ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणांमुळे जागतिक व्यापारासाठी धोकादायक संकेत मिळत असून सोने या व्यापार युद्धाच्या केंद्रस्थानी आहे. अनेक तज्ञांनी जगात मंदी येण्याची शक्यता वर्तवल्याने सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जात आहे. मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

चांदीनेही भाव खाल्ला

चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत असून चांदीचे दर प्रतिकिलो एक लाखावर पोहोचले आहेत. बाजारात 96 हजार 700 रुपये प्रतिकिलो दर असणाऱ्या चांदीच्या दरात तब्बल 3 हजार 800 रुपयांची वाढ झाली आहे. हे दर आणखी वाढणार असल्याने ग्राहकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले