Konkan Shimgotsav 2025 – अमोल किर्तीकर यांनी नाचवली शिर्दे येथील ग्रामदैवत स्वयंभू श्री.भोमेश्वराची पालखी
शिर्दे येथील ग्रामदैवत श्री. भोमेश्वराच्या पालखीला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि युवा सेना राष्ट्रीय सरचिटणीस अमोल किर्तीकर यांनी मानाने नाचवली. यावेळी अमोल किर्तीकर यांचे कुटुंबीय मोठ्या उत्साहाने ग्रामदैवताच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
दापोली तालुक्यातील शिर्दे हे शिवसेना उपनेते अमोल गजानन किर्तीकर यांचे गाव आहे. या गावात श्री. भोमेश्वर हे स्वयंभू देवस्थान आहे. शिर्दे ग्रामदैवत श्री. भोमेश्वर या ग्रामदैवतेची शिमगोत्सवात पालखी घर भेटीला देवळा बाहेर पडते तेव्हा पहिला मान हा गजानन किर्तीकर यांना दिला जातो. त्यानंतर अन्य मानकऱ्यांना मान दिल्यानंतर पालखी गावातील घरे घेते. दरवर्षी अमोल किर्तीकर हे शिमगोत्सवात न चुकता आपल्या शिर्दे गावी येतात. शिमगोत्सवात घर भेटीला देवळा बाहेर पडणाऱ्या पालखीत मुख्य देवता श्री भोमेश्वरासह कोटेश्वरी, झोलाई आणि काळकाई आदी देवतांच्या मूर्ती पालखीत बसवतात. शिमगोत्सवात शनिवारी श्री. भोमेश्वराची पालखी घर भेटीसाठी बाहेर पडली त्यावेळी किर्तीकर यांचे सारे कुटुंब देव दर्शनासाठी उपस्थित होते. तसेच किर्तीकर यांची बाग सांभाळणारे भावेश धामणे तसेच बळीराम केंबळे यांच्या कुटुंबियांसह येथील कामगार वर्ग तसेच स्थानिक ग्रामस्थ महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सर्वांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. ग्रामदेवतेच्या पालखीतील देवतांची पुजा अर्चा झाल्यावर अमोल किर्तीकर यांनी श्री. भोमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले, त्यानंतर नैवेद्य दाखवला व देवतेला यावेळी गाऱ्हाणे घालण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List