मुंबईतून क्लीन–अप मार्शल हद्दपार होणार, मांडवलीच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका; मेपासून येणार नवे स्वच्छतादूत

मुंबईतून क्लीन–अप मार्शल हद्दपार होणार, मांडवलीच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका; मेपासून येणार नवे स्वच्छतादूत

>>देवेंद्र भगत

मुंबई स्वच्छ-सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांवर नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेने नेमलेल्या ‘क्लीन-अप मार्शल’कडून मांडवली करून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे मुंबईतून ‘क्लीन-अप मार्शल’ हद्दपार केले जाणार आहेत. क्लीन-अप मार्शल नेमलेल्या कंत्राटदाराची मुदत मेमध्ये संपणार असून हे कॉण्ट्रक रद्द करून नवा पर्याय शोधला जाणार आहे.

मुंबईत तीन वर्षांपूर्वी ‘क्लीन-अप मार्शल’ पुरवणाऱ्या संस्थेच्या कंत्राटाची मुदत संपल्याने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई थांबली होती, मात्र 2 एप्रिल 2024 पासून पुन्हा ही कारवाई सुरू झाली. महापालिकेच्या आयटी विभागाने ऑनलाइन अॅपद्वारे दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी क्लीन-अप मार्शलकडे मोबाईल ब्ल्यूटूथवर चालणारा छोटा प्रिंटर देण्यात आला आहे. या प्रिंटरद्वारे दंडाकरिता स्वतंत्र पावती छापून दिली जात आहे. दंडाची अर्धी रक्कम पालिका तर अर्धी रक्कम कंत्राटदाराला मिळत आहे. हा दंड टाळण्यासाठी मुंबईकरांनी स्वच्छता राखावी, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेच्या 24 वॉर्डमध्ये सुमारे एक हजार क्लीन-अप मार्शल आहेत.

आतापर्यंत पाच कोटींचा दंड वसूल

वॉर्डमध्ये क्लीन-अप मार्शलकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईनुसार 1 लाख 68 हजार 505 जणांविरोधात चलान कापून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 4 कोटी 84 लाख 06212 इतका दंड वसूल करण्यात
आला आहे.

हे करू नका, अन्यथा दंडात्मक कारवाई

  1. उघडय़ावर इतरत्र कचरा टाकणे – 200 रुपये
  2. सार्वजनिक ठिकाणी उघडय़ावर थुंकणे – 200 रुपये
  3. उघडय़ावर स्नान करणे – 100 रुपये
  4. दुकानाबाहेर कचऱ्याचा डबा न ठेवणे – 500 रुपये
  5. कचरा विलगीकरण न करणे – 500 रुपये
  6. प्राणी व पक्ष्यांना उघडय़ावर खाऊ टाकणे – 500 रुपये
  7. धोकादायक कचरा निर्देशित न करणे – 500 रुपये

नायरमध्ये क्लीन-अप मार्शलकडून कारवाईच्या नावाखाली पैसे घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे केईएम, नायर, शीव, कूपर आणि 16 उपनगरीय रुग्णालयांमधून क्लीन-अप मार्शल सेवा बंद करण्यास सुरुवात झाली आहे.

काही ठिकाणी रेंजचा अडथळा असल्यामुळे इलेक्ट्रिक मशीनमधून पावती देता येत नसल्याने रोख पैसे घेतल्याचा दावा क्लीन-अप मार्शलकडून करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांशी वादावादीचे प्रसंग घडत असल्याचे समोर येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यात उष्णतेचा पारा 40 पार, मुंबईत उकाडा वाढणार की कमी होणार ? पुण्यात उष्णतेचा पारा 40 पार, मुंबईत उकाडा वाढणार की कमी होणार ?
उन्हाळा आता तोंडावर आला असून हळूहळू उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्यातच आता...
सर्वसामान्यांना महागाईचा तडाखा, मटणालाच नाही तर दुधाला दरवाढीची उकळी, ग्राहकांचा खिशावर बोजा
आधी ‘जब वी मेट’साठी करीना नाही म्हणाली, पण ‘या’ व्यक्तीने मनवताच तयार झाली
आधी ब्रेकअपची चर्चा, नंतर पार्टीत एकत्र, तमन्ना भाटिया- विजय वर्माचा व्हिडिओ पाहाच
या सुपरस्टारच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू, 10 वर्षे वाट पाहिली, 53 व्या वर्षीही एकटी
Aamir Khan : इरफान पठाणच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठीही आमिर-गौरी दिसले एकत्र ! Video व्हायरल
पार्किंगच्या वादातून मारहाण; शास्त्रज्ञाचा मृत्यू, बहिणीने किडनी देऊन वाचवला होता जीव