कोण नामदेव ढसाळ? या कार्यक्रमाचे आयोजन
कोण कवी नामदेव ढसाळ असा प्रश्न विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्ड आणि त्यांच्या उर्मट अधिकाऱ्यांना जाब विचारणारा ‘कोण नामदेव ढसाळ? तुही यत्ता कंची?’ हा साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्यावरील कार्यक्रम शनिवार, 19 एप्रिलला दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात शाहीर संभाजी भगत, नीरजा, डॉ. प्रज्ञा दया पवार, चिन्मयी सुमित, मंदार फणसे, हेमंत ढोमे, कैलास वाघमारे, अक्षय शिंपी, दीपक राजाध्यक्ष, युवराज मोहिते सहभागी होतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List