काम केले 50 हजारांचे, बिल काढले 2 लाखांचे! पुणे बाजार समिती संचालक मंडळाचा प्रताप

काम केले 50 हजारांचे, बिल काढले 2 लाखांचे! पुणे बाजार समिती संचालक मंडळाचा प्रताप

सेसगळती, शेतकरी, ग्राहक, वाहनचालकांची लूट, भ्रष्ट कारभार अशी ओळख असलेल्या पुणे बाजार समितीत विकासकामांच्या नावाखाली मनमानी पद्धतीने बिले काढण्याचे धंदे सुरू झाले आहेत. बाजारात विद्युत पॅनेल दुरुस्तीसाठी सुमारे पन्नास हजार रुपयांचा खर्च असताना प्रत्यक्षात तब्बल 1 लाख 94 हजार 794 रुपयांचे बिल कार्योत्तर मंजुरीने

अदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एव्हढेच नाही तर अशा उलटसुलट कामासाठी पुणे सोडून चक्क धाराशिव येथील ठेकेदाराची निवड केल्याचे समोर आले आहे.

बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळे भाजीपाला विभागातील सर्व ठिकाणचे विद्युत बॉक्सची व वेदर शेडची विजतंत्री विभागाने पाहणी केली. या पाहणीत विद्युत बॉक्सला झाकणे, लॉक, दरवाजे व त्यावरील वेदर शेडचे पत्रे खराब झाले असून ते बदलणे कामास व त्याकामी होणारे खर्चाचे अंदाजपत्रक विद्युत सल्लागार विजयकुमार दत्तात्रय जगताप यांच्याकडून मागविले. बंद पाकीट योजनेद्वारे बाजार समितीने मर्जीतल्या धाराशिव येथील जे. के. इलेक्ट्रिकल्स या ठेकेदाराला हे काम दिले. दोन बाय तीन किंवा चार फुटांच्या 24 विद्युत बॉक्सला रंग दिला. या कामासाठी 50 हजारदेखील खर्च आला नसताना बाजार समितीने 1 लाख 94 हजार 794 रुपयांचे बिल अदा केले. तर, ठेकेदाराने बक्षिसी म्हणून 1580 रुपये बाजार समितीला सूट दिल्याचे नमूद केले आहे.

ठेकेदार निवडला धाराशिवचा !

धाराशिव येथील जे. के. इलेक्ट्रिकल्स या ठेकेदारासह डी. के. इलेक्ट्रिकल्स, एस. डी. इलेक्ट्रिकल्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर या ठेकेदारांनी या कामासाठी बंद पाकिटात निविदा भरली. मात्र, दोन ठेकेदारांनी एकाच दिवशी दरपत्रक फॉर्म फी भरली असून, पावती क्रमांकमध्ये एक वगळता सलगता आहे. काम नसताना बळजबरीने काम दाखविण्याचा संशयास्पद प्रकार असून, निविदा प्रक्रियेतही रिंग झाल्याचे दिसून येते. केवळ कामे न करता बिले काढण्याच्या उद्देशानेच धाराशिव येथील जे. के. इलेक्ट्रिकल्स ठेकेदार निवडला आहे का, असा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे. तर, यावर प्रशासनाकडून बोलण्यास टाळाटाळ केली जात असून सध्या तरी प्रशासनाने हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच आहेत. मंगळवारी आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक...
हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
IPL 2025 – भाऊ तुला मानलं! युवा खेळाडूंसाठी शिवम दुबेकडून लाखमोलाच्या मदतीची घोषणा
तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्याने जीवन संपवले, आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल
Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका
Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म