मनोज कुमार यांचे निधन, भारत की बात सुनानेवाला अभिनेता काळाच्या पडद्याआड
‘भारत का रहनेवाला हूं, भारत की बात सुनाता हूं…’ असं म्हणत चित्रपटांच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रवाद जागवणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी या ‘भारत कुमार’ने अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांनी पाच दशकांहून अधिक काळ मोठा पडदा गाजवला. चित्रपटाच्या माध्यमातून क्रांतिकारक, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे जीवन रुपेरी पडद्यावर आणले. ‘क्रांती’ची ज्योत पेटवली. एका सच्चा देशप्रेमी कलावंताच्या जाण्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मनोज कुमार यांच्या पार्थिवावर शनिवारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानावरून निघेल. मनोज कुमार यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा कुणाल गोस्वामी यांनी दिली. पहाटे 3.30 च्या सुमारास कोकिलाबेन रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे कुणाल यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List