यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड

यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड

‘हर घर जल’ योजनेतून शहरांबरोबरच गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेचे पितळ उघडे पाडणारी हृदयद्रावक घटना यवतमाळमध्ये समोर आली आहे. आर्णी तालुक्यात घरात नळ येऊनही पाणीपुरवठा सुरू न झाल्याने पाण्याकरिता वणवण करणाऱ्या वेदिका चव्हाण या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत ओढवला. वस्तीपासून दीड किलोमीटर अंतरावरील अरुणावती नदीत पाणी आणण्याकरिता गेलेल्या वेदिकाचा पाय घसरून नदीत पडून तिचा बुडून मृत्यू झाला.

वेदिका राहत असलेल्या आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी वस्तीतील प्रत्येक घराबाहेर एक वर्षापासून सरकारची पाण्याची पाइपलाइन आली आहे. मात्र या ठिकाणी केवळ नळ लागले आहेत. पाणीपुरवठा सुरू न झाल्याने लोकांची पाण्यासाठीची वणवण सुटलेली नाही. त्यात वस्तीतला पाण्याचा एकमेव हँडकंपही चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे लोकांना जीव धोक्यात घालून दीड किलोमीटरची पायपीट करत अरुणावती नदीतून पाणी आणावे लागते. त्यातच पाणी आणण्याकरिता गेलेल्या वेदिकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने सरकारच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.

आधीही अनेकांचा जीव गेला

वेदिकाप्रमाणे या परिसरात पाण्याकरिता वणवण करताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा घटना घडल्या की एक-दोन टँकर पाठवून लोकांना शांत केले जाते. मात्र लोकांच्या दाराबाहेर आलेल्या नळांना पाणीपुरवठा करण्याकरिता सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. सरकारच्या या ढिसाळ कारभाराविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा शिवसेना टेकओव्हर का केली नाही? राज ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा शिवसेना टेकओव्हर का केली नाही? राज ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला
महेश मांजरेकर यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या...
Explainer : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या 7 कारणांमुळे एकत्र येणार; पाचवं कारण सर्वात महत्त्वाचं
राज आणि उद्धव यांच्या युतीच्या वावड्यांवर भुजबळ यांचे महत्वाचं वक्तव्य, त्यांचं एकत्र येणं ही…
सिझेरियन डिलिव्हरीनंतर काय खावे आणि काय खाऊ नये, काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या
‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; जगातील सर्वात दुर्दैवी गाणं;62 वर्षांनंतर बॅन हटवलं, चुकूनही ऐकू नका
‘ही दुसरी जया बच्चन’,’केसरी चॅप्टर 2′ च्या स्क्रीनिंगदरम्यान काजोल पापाराझींवर चिडली; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
Nagpur News – नागपूरमध्ये भांडेवाडी डंपिंग ग्राऊंडला भीषण आग, अग्नीशमन दलाचा एक बंबही जळून खाक