JEE Main 2025 Toppers List – महाराष्ट्राच्या पोरांची भरारी! जेईई मेन परीक्षेत तिघांना मिळाले 100 पैकी 100 गुण
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा सत्र 2 (JEE Mains सत्र 2 निकाल) चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेमध्ये देशभरातून एकूण 24 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. या परीक्षेत बसलेले विद्यार्थी jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू शकतात.
JEE Mains सत्र 2 परीक्षेमध्ये 24 विद्यार्थ्यांनी 10 पैकी 100 गुण मिळवले आहेत. यातील सर्वाधिक 7 विद्यार्थी राजस्थानचे आहेत, तर महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी तीन विद्यार्थी आहेत. पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरातमधील प्रत्येकी दोन, तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील प्रत्येक एका विद्यार्थ्याने 100 टक्के गुण मिळवले आहेत.
100 पैकी 100 गुण मिळवणारे विद्यार्थ्यांचे नाव आणि राज्य
- मोहम्मद अनस – राजस्थान (पुरुष)
- आयुष सिंघल – राजस्थान (पुरुष)
- आर्किसमन नंदी – पश्चिम बंगाल (पुरुष)
- देवदत्त माझी – पश्चिम बंगाल (स्त्री)
- आयुष रवी चौधरी– महाराष्ट्र (पुरुष)
- लक्ष्य शर्मा – राजस्थान (पुरुष)
- कुशाग्र गुप्ता – कर्नाटक (पुरुष)
- हर्ष गुप्ता – तेलंगणा (पुरुष)
- आदित प्रकाश भेगडे – गुजरात (पुरुष)
- दक्ष – दिल्ली (पुरुष)
- हर्ष झा – दिल्ली (पुरुष)
- रजित गुप्ता – राजस्थान (पुरुष)
- श्रेयस लोहिया – उत्तर प्रदेश (पुरुष)
- सक्षम जिंदाल – राजस्थान (पुरुष)
- सौरव – उत्तर प्रदेश (पुरुष)
- वनगाला अजय रेड्डी – तेलंगणा (पुरुष)
- सानिध्या सराफ– महाराष्ट्र (पुरुष)
- विशाद जैन – महाराष्ट्र (पुरुष)
- अर्णव सिंग – राजस्थान (पुरुष)
- शिवेन विकास तोष्णीवाल – गुजरात (पुरुष)
- कुशाग्र बांघा – उत्तर प्रदेश (पुरुष)
- साई मनोगना गुठीकोंडा – आंध्र प्रदेश (स्त्री)
- ओम प्रकाश बेहरा – राजस्थान (पुरुष)
- बानी ब्रता माझी – तेलंगणा (पुरुष)
दरम्यान, जेईई मेन्स सत्र 1 पेपर 1 (बी.ई. / बी.टेक) परीक्षा 22, 23, 24, 28 आणि 29 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आली होती. तर सत्र 2ची परीक्षा 2,3,4,7 आणि 8 एप्रिल रोजी घेण्यात आल्या होत्या. ही परीक्षा 13 भाषांमध्ये घेण्यात आली. त्यात हिंदी, इंग्रजी, बंगाली, गुजराती, आसामी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश होता. आता या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List