व्यंकूची अशीही शिकवणी…! शिक्षकच विद्यार्थ्यांना शिकवतोय मद्यपानाचे धडे; वाचा सविस्तर…
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना चांगल्या भविष्याच्या दृष्टीने मार्ग दाखवणारा देवदूत असतो. शिक्षकाच्या शिकवणीने आणि मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळते. मात्र जर योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर एका क्षणात विद्यार्थ्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. याचाच प्रत्यय मध्य प्रदेशात आला असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना येथे घडली आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांना दारू पाजल्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील कटनी येथे घडली आहे.नवीन प्रताप सिंग बघेल असे या शिक्षकाचे नाव आहे. नवीन खिरहानी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. नवीन रोज दारू पिऊन शाळेत येतो आणि शाळेतील विद्यार्थ्यांनाही व्यसन करण्यास शिकवतो, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान या शिक्षकाचा एका अज्ञाताने व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हि़डीओमध्ये नवीन विद्यार्थ्यांना मद्यपान आणि धुम्रपान करण्यास प्रवृत्त करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे ही घटना उघड झाली. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप यादव यांनी शिक्षकाला तात्काळ निलंबित केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List