अमेरिकेची जगभरात ‘कर’कचून नाकाबंदी, फ्रान्सने गुंतवणूक थांबवली चीनने 34 तर कॅनडाने 25 टक्के कर लादला

अमेरिकेची जगभरात ‘कर’कचून नाकाबंदी, फ्रान्सने गुंतवणूक थांबवली चीनने 34 तर कॅनडाने 25 टक्के कर लादला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल 60 देशांवर जशास तसे आयात शुल्क लागू केले. या आदेशानुसार हिंदुस्थानवर 26 टक्के आयात शुल्क लादण्यात आले. मात्र, या निर्णयामुळे अमेरिकेचीच जगभरात ‘कर’कचून नाकाबंदी सुरू झाल्याचे चित्र आहे. अतिरिक्त आयात शुल्कामुळे संतापलेल्या फ्रान्सने अमेरिकेतील गुंतवणूक थांबवली तर चीनने 34 टक्के आणि कॅनडाने 25 टक्के कर लादून अमेरिकेवर डोळे वटारले आहेत. त्यामुळे जगभरात सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा आणखी भडका उडण्याची शक्यता आहे.

मोदींचे मौन, काँग्रेसची टीका

अमेरिकेने लादलेल्या करावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन व्रत धारण केले आहे. अनेक देशांचे अमेरिकेशी चांगले संबंध आहेत. त्या देशांतील नेत्यांनीही अमेरिकेचा निर्णय चुकीचा असल्याचे आपल्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने म्हटले आहे. परंतु, ट्रम्प यांचे मित्र म्हणवणारे मोदी अद्याप गप्पच आहेत, अशी तोफ काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी डागली.

10 एप्रिलपासून अमेरिकेतून आयात केलेल्या सर्व वस्तूंवर 34 टक्के अतिरिक्त कर वसूल केला जाईल, असे चीनने स्पष्ट केले आहे. आम्ही स्वतःच्या अधिकारांचे आणि हिताचे रक्षण करण्यासाठी प्रत्युत्तरात्मक उपाय करत आहोत. दोन बड्या अर्थव्यवस्थांमधील तणावाचे व्यापार युद्धात रुपांतर होण्याची शक्यता आहे, असे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

अमेरिकन शेअर बाजारात प्रथमच कोलाहल

अमेरिकेच्या अतिरिक्त आयात शुल्काचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारातही दिसला. पाच वर्षांत पहिल्यांदाच शेअर बाजारात कोलाहल माजले, अशी प्रतिक्रिया हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक म्हणून काम करणारे आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि हीलरी क्लिंटन यांच्यासोबत काम केलेल्या लॉरेन्स समर्स यांनी दिली. अमेरिकन शेअर बाजारासाठी आजचा दिवस अत्यंत भयंकर होता, असे ते म्हणाले.

कच्च्या तेलाच्या किमती नीचांकी पातळीवर

कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षांतील नीचांकी पातळीवर गेल्या आहेत. ब्रेंट फ्युचर्सचा दर शुक्रवारी 5.72 डॉलरने गडगडून 64.62 डॉलरवर आला. ही घसरण 8.2 टक्के आहे. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड फ्युचर्सचा 5.90 डॉलरने घसरून 61.05 डॉलरवर स्थिरावला. ही घसरण 8.8 टक्के आहे.

चीन घाबरले, चुकीची खेळी केली – ट्रम्प

चीनने अमेरिकेतील उत्पादनांवर 34 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन घाबरले असून त्यांनी चुकीची खेळी केल्याची प्रतिक्रिया टथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. चीनला अशी जोखीम उचलणे परवडणारे नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

शेअर बाजार कोसळले

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 930 अंकांनी कोसळून 75,364 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 340 अंकांनी घसरून 22,909 अंकांवर स्थिरावला. मोठ्या प्रमाणावर झालेल्या शेअर्सच्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे 9.5 लाख कोटी रुपये बुडाले. जेएसडब्ल्यू, अदानी इंटरप्रायझेस, पीएसयू बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली. दरम्यान, फार्मा सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्सही गडगडले. फार्मा इंडस्ट्रीजला एका वेगळ्या कॅटेगरीत पाहिले जात आहे. यासंबंधी लवकरच एक मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

CIDमधील ACP प्रद्युम्न यांचा प्रवास खरंच संपणार? शिवाजी साटम यांनीच सांगितलं सत्य… CIDमधील ACP प्रद्युम्न यांचा प्रवास खरंच संपणार? शिवाजी साटम यांनीच सांगितलं सत्य…
CID मालिकेला वेगळ्या परिचयाची गरज नाही. सुमारे 20 वर्षांपासून सुरू असलेला हा प्रसिद्ध हिट थ्रिलर शो प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग...
Manoj Kumar Death: रुद्राक्ष, साईबाबांची विभूती आणि…, मनोज कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी रवीनाने आणल्या 3 गोष्टी
माणिकराव कोकाटे म्हणजे कृषिक्षेत्रातील कुणाल कामरा झालेत; रोज शेतकऱ्यांची खिल्ली उडवताहेत, संजय राऊत यांचा हल्लाबोल
मोदी ट्विटर PM, सोशल मिडिया हा त्यांचा वेगळा देश; ‘टॅरिफ वॉर’वरील मौनावरून संजय राऊत यांची घणाघाती टीका
सुंदर दिसण्यासाठी नाकाची केली सर्जरी, नंतर ओळख निर्माण करण्यासाठी नवऱ्यालाही सोडले…
टॅरिफ ही तर श्रीमंत होण्याची संधी, बदलांच्या काळात आर्थिक दुर्बल संपतील; शेअर बाजारातील घसरणीबाबत ट्रम्प यांचे धक्कादायक विधान
मुलांना सोशल मीडिया बंदी कोर्ट घालू शकत नाही, संसदेला कायदा करायला सांगा; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली