अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला सोने खरेदीचा फायदा होणार…वर्षभरात दिला जबरदस्त परतावा
आपल्या संस्कृतीत साडेतीन मुहूर्तात शुभकार्य करण्यास प्राधान्य असते. तसेच या मुहूर्तावर सोनेखरेदीचेही विशेष महत्त्व आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात व्यावहारिक दृष्टीनेही सोनेखरेदीला जास्त महत्त्व आले आहे. तसेच शेअर बाजार, म्युचुअल फंड, रियल इस्टेट यांच्या परताव्याचा विचार केल्यास सोन्याने नेहमीच अव्वल परतावा दिला आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढले असले तरी यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला सोने खरेदी करावी किंवा नाही, असा विचार अनेकजण करत आहेत.
अक्षय्य तृतीया म्हणजे कधीही नष्ट न होणारा असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे या मुहूर्तावर खरेदी केलेली वस्तू आपल्याकडे कायम टिकते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी सोनेखरेदीला विशेष महत्त्व आहे. तसेच सध्या जगात अस्थिरतेचे वातावरण असून मंदीचे संकट गडद होत आहे. त्यामुळे गुतंवणूकदारांचाही सोन्याकडे ओढा वाढला आहे. गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेपासून ते आतापर्यंतच्या एका वर्षात सोन्याने 31 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला 24 कॅरेट सोने 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम होते. दिवाळीनंतर सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभरा स्वीकारल्यानंतर त्यांच्या धोरणामुळे जगात अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यामुळे सोन्यात मोठ्या प्रमाणात गुतंवणूक होत असल्याने सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. सध्या सोन्याचा भाव 96 हजार रुपयांवर पोहचला आहे. लवकरच सोने एका लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. एका वर्षात सोन्याने 31 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही जबरदस्त वाढ होत आहे. चांदीनेही एक लाखाचा टप्पा गाठला आहे.
सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 94,910, 23 कॅरेट 94,530, 22 कॅरेट सोने 86,938 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 71,183 रुपये, 14 कॅरेट सोने 55,522 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,151 रुपये इतका झाला आहे. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने यंदा अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List