एका भाषेचा समावेश झाला तर काय बिघडलं? पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य
त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली आता महाराष्ट्रातही पहिलीपासून मराठी-इंग्रजीसोबत हिंदीचे धडे विद्यार्थ्यांना गिरवावे लागणार आहेत. या हिंदीची सक्तीला विरोध होत असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजब विधान केले आहे. एका भाषेचा समावेश झाला तर काय बिघडलं? असा सवाल करत त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि त्याचे उद्दिष्ट समजून घेतले पाहिजे असेही म्हटले.
शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदीचाही समावेश असेल तर काय बिघडले? मराठी ही आपली भाषा आहेत. त्याबाबत तडजोड नाही, पण केंद्राचे राष्ट्रीय शिक्षण धोरणही समजू घेतले पाहिजे. त्याचे उद्दिष्ट काय आहे हे समजून घेतले पाहिजे. मराठीबाबत तडजोड नाही, पण हिंदीही यायला हवी.
देशात फिरताना काही लोक हिंदी, काही इंग्रजी, काही तमिळ बोलतात. उत्तर प्रदेशसह देशातील जवळपास 60 टक्के राज्यातील कारभार हिंदीत चालतो. लोक हिंदीमध्ये बोलतात. त्यामुळे त्या-त्या राज्याच्या भाषेबाबत अस्मिता ठेऊन हिंदीही यायला हवी. यावरून राजकारण, आंदोलन, एखाद्याला मारहाण करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रभाषा नाही राजभाषा
दरम्यान, बावनकुळे यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे काल म्हटले होते. यामुळे त्यांच्यावर टिकेचा भडिमार होऊ लागला. आता बावनकुळे यांनी सारवासारव करत काल बोलताना आपल्याकडून चुकी झाल्याचे म्हटले. खरेतर मी बोलताना चुकलो, हिंदी ही राष्ट्राभाषा म्हणण्याऐवजी राजभाषा आहे असे म्हणायला हवे होते, असे बावनकुळे म्हणाले.
हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List