डहाणूत तीन हजार क्विंटल भात भस्मसात, आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामाला आग लागली की लावली?

डहाणूत तीन हजार क्विंटल भात भस्मसात, आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामाला आग लागली की लावली?

आदिवासी विकास महामंडळाच्या घोळ येथील भात खरेदी केंद्रावरील गोडाऊनला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत तब्बल तीन हजार क्विंटल भात आणि 30 हजारांहून अधिक बारदाने भस्मसात झाली आहेत. या घटनेला 24 तास उलटून गेले तरी आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. एकीकडे पालघर जिल्ह्यातील शेतकरी आधीच संकटात आहेत. भात खरेदीच्या व्यवहारात काही घोटाळा झाला आहे काय? याची चर्चा असून हा घपला लपवण्यासाठी ही आग लागली की कोणी लावली? अशी ज्वलंत चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. दरम्यान, कासा पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

या आगीत गोडाऊनमधील सुमारे तीन हजार 70 क्विंटल भात आणि 30 हजारांहून अधिक बारदाने भस्मसात झाली. मध्यरात्री गोडाऊनमधून धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी झोपेतून जागे होत घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता.

दीड तासानंतर आग आटोक्यात

डहाणू नगर परिषद, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, जेसीपी मागवत जळलेले धान्य बाहेर काढण्यात आले.

गोडाऊनमध्ये मध्यरात्री आग लागली असल्याचा कॉल आला. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र ही आग अज्ञात व्यक्तीने लावली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून नुकसानीचा आकडा अद्याप समजू शकला नाही.
– योगेश पाटील (व्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय जव्हार)

रात्रीच्या दरम्यान या गोडाऊनला आग लागल्याचे आम्हाला कळल्यावर आम्ही त्वरित भात खरेदी केंद्र अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला. शासनाने या भागात सुरक्षितता उपाययोजना कराव्यात व स्थानिक स्तरावर अग्निशमन व्यवस्था उभारावी तसेच भात खरेदी गोडाऊनला सुसज्ज इमारत मिळावी. – सुदाम कदम (ग्रामपंचायत सदस्य)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही…संजय राऊतांनी हाणला टोला, अजित पवारांच्या भूमिकेविषयी मोठे भाष्य Sanjay Raut : शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही…संजय राऊतांनी हाणला टोला, अजित पवारांच्या भूमिकेविषयी मोठे भाष्य
उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. एकनाथ शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू...
मुस्लीम असूनही सतत केदारनाथला का जाते? सारा अली खानचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
भगवा पट्टा, आतमध्ये राम मंदिर.. सलमानच्या हातातील घड्याळ पाहून चिडले मौलाना
WITT 2025: कमी कालावधीत मिळालेल्या प्रसिद्धी आणि यशाबद्दल विजय देवरकोंडा म्हणाला…
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुण्यात घडले दर्शन, ब्राह्मण व्यक्तीवर मुस्लिम व्यक्तीच्या सहकार्याने विधिवत अंत्यसंस्कार
‘हे’ अत्यंत चिल्लर लोकं, संजय राऊत यांचा मिंध्यांवर घणाघात
सोलापूर बाजार समितीची निवडणूक होणार चुरशीची; 18 जागांसाठी 479 जणांचे अर्ज, शेवटच्या दिवशी 270 अर्ज दाखल