म्यानमार-थायलंडला भूकंपाचा तडाखा, 144 जणांचा मृत्यू, 800 हून अधिक जखमी
म्यानमार आणि थायलंड शुक्रवारी भूकंपाने हादरले असून 7.7 रिक्टर स्केलच्या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये मोठी हानी झाली आहे. या भूकंपात आतापर्यंत 144 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर यात 800 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू म्यानमारमधील मंडाले शहरात होते. या भूकंपाचे धक्के हिंदुस्थान, थायलंड, बांगलादेश आणि चीनमध्येही जाणवले आहेत.
या भूकंपामुळे बँकॉकमध्येही अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. सोशल मीडियावर या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये कोसळलेल्या इमारती आणि बचाव कार्याचे दृश्य दिसत आहेत. दरम्यान, म्यानमार हा जगातील अशा देशांमध्ये समाविष्ट आहे, जो भूकंपाच्या बाबतीत धोकादायक देश आहे. म्यानमारमध्ये दरमहा 8 भूकंप होतात. यामागचे कारण म्हणजे, म्यानमारपासून रिंग ऑफ फायरपर्यंतचे अंतर जास्त नाही, जिथे जगातील 81 टक्के भूकंप होतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List