महापालिकेत सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या, महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

महापालिकेत सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या, महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

मुंबई महापालिकेतील एक सहआयुक्त, 6 उपायुक्तांसह 12 सहाय्यक आयुक्तांच्या आज बदल्या आणि बढत्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱयांच्या पदस्थापनाविषयक आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

या बदल्यांमध्ये विश्वास शंकरवार सहआयुक्त (परिमंडळ 4) यांची सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) (संपर्क अधिकारी, मागासवर्ग कक्ष) येथे बदली. भाग्यश्री कापसे- उपायुक्त (परिमंडळ 7) यांची उपायुक्त (परिमंडळ 4) येथे बदली करण्यात आली आहे. संजय कुऱहाडे – उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) (प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एडस् नियंत्रण संस्था) यांची उपायुक्त (परिमंडळ 7) येथे बदली करण्यात आली आहे. तर शरद उघडे – सहायक आयुक्त (डी विभाग) यांची उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) (माहिती तंत्रज्ञान विभाग) (प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एडस् नियंत्रण संस्था) येथे बदली करण्यात आली आहे. अजित आंबी सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) यांची उपायुक्त (उद्याने) येथे बदली करण्यात आली आहे. पांडुरंग गोसावी – प्रमुख लेखापाल (पाणीपुरवठा व मलःनिसारण) यांची उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) येथे बदली करण्यात आली आहे. विश्वास मोटे – सहायक आयुक्त (एम पश्चिम विभाग) यांची उपायुक्त (परिमंडळ 3) येथे बदली करण्यात आली आहे.

विनायक विसपुते – सहाय्यक आयुक्त (एच पश्चिम विभाग) यांची सहाय्यक आयुक्त (जी उत्तर विभाग) (सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण निर्मूलन, पूर्व व पश्चिम उपनगरे) येथे बदली करण्यात आली आहे. तर मनीष वळंजू – सहाय्यक आयुक्त (के पूर्व विभाग) यांची सहाय्यक आयुक्त (डी विभाग) (सहाय्यक आयुक्त, बाजार विभाग – अतिरिक्त कार्यभार) येथे बदली करण्यात आली आहे. अलका ससाणे – सहाय्यक आयुक्त (एम पूर्व विभाग) यांची सहाय्यक आयुक्त (एस विभाग) येथे बदली करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाची संपत्ती तुमच्या पप्पाची जहागीर नाही, काय म्हणाले की इम्तियाज जलील वक्फ बोर्डाची संपत्ती तुमच्या पप्पाची जहागीर नाही, काय म्हणाले की इम्तियाज जलील
रमजान ईदच्या एक दिवस आधी बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.यावर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी...
मधूर आवाजासाठी ‘ही’ प्रसिद्ध गायिका पिते ‘स्पर्म कॉकटेल’, ऐकून इंडस्ट्री हादरली
Virat Kohli – 2027 चा वर्ल्ड कप खेळणार? विराटने निवृत्तीवर केलं मोठं विधान
Waqf Amendment Bill – NDA ची उद्या अग्निपरीक्षा! भाजप, काँग्रेसने खासदारांना बजावला व्हिप; इंडिया आघाडीने बोलावली महत्त्वाची बैठक
लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या… कुणाल कामराने शेअर केली पोस्ट
Jalna News – जालना जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वार्‍यासह पावसाची शक्यता, दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
Ratnagiri Accident चाफे येथे अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने ट्रक पेटवला