रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी हिंदुस्थानी सीमांना सील करणं गरजेचं – अनिल देसाई
रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी भारताच्या सीमांना सील करणे अत्यंत गरजेचे आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई लोकसभेत म्हणाले आहेत. लोकसभेत बोलताना अनिल देसाई म्हणाले की, “विधेयक स्थलांतर व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि सुव्यवस्थित करण्यासाठी आणले असून, बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या परदेशी नागरिकांना प्रवेशबंदी घालण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, स्थलांतर अधिकाऱ्यांना संशयितांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, मात्र या अधिकारांचा समतोल राखणे गरजेचे आहे.”
अनिल देसाई म्हणाले की, “सीमांची सुरक्षितता वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असून, विशेषतः रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, हे करताना परराष्ट्र संबंध आणि द्विपक्षीय सहकार्य टिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे विधेयक एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, मात्र त्यातील काही तरतुदींवर अधिक चर्चा होऊन संतुलित विचार करण्याची गरज आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List